भाजपनं ‘त्या’ 2 अटी नाकारल्या ? नाहीतर राज्यात भाजप – राष्ट्रवादीचं सरकार असतं !

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपसोबत एकत्र लढूनही शिवसेना निवडणुकीनंतर भाजपपासून वेगळी झाली. तर भाजप-शिवसेनेविरुद्ध निवडणुका लढविणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे राज्यात भाजपला सत्तेपासून दूर रहावे लागेल. पण राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शरद पवारांना धक्का देत भाजपला पाठिंबा दिला. त्या पाठिंब्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन केले. मी पुन्हा येईन, असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनले. त्यानंतर घडलेल्या घडामोडीनंतर सरकार कोसळले. मात्र, अजित पवारांनी शरद पवारांच्या संमतीशिवाय पाठिंबा का दिला, अशी चर्चा सुरु झाली. पण शरद पवार यांच्या दोन अटी भाजपने मान्य केल्या असत्या, तर भाजपने महाराष्ट्रातील सत्ता गमावली नसती, असे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दोन अटी मान्य केल्या असत्या तर भाजपाची सत्ता राज्यामध्ये कायम राहिली असती. भाजपला राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळाला असता, अशी माहिती आहे. त्यानुसार मोदी सरकारमध्ये सुप्रिया सुळे यांना कृषीमंत्रीपद देण्यात यावे अशी अट घालण्यात आली होती. तर दुसरी अट म्हणजे राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी दुसरा कोणत्याही व्यक्तीला मुख्यमंत्री पद द्यावे. भाजपमधील काही सुत्रांनी IANS वृत्तसंस्थेला माहिती दिलीय. त्यानुसार जर महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादीला कृषीमंत्रीपद दिले तर बिहारमध्ये जुना मित्र पक्ष रेल्वे मंत्रीपदाचा दावा करेल याची भीती भाजपला होती. त्यामुळे स्पष्ट बहुमत असतानाही दोन मोठी खाती भाजपकडून जातील असे भाजपला वाटत होते.

ADV

शरद पवारांनी पाठवला होता ‘हा’ संदेश
शरद पवार यांनी भाजपध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन अटीसोबतचा निरोप पाठवला होता. त्यामुळेच, निकालानंतर भाजपविरुद्ध शरद पवारांनी मोठी टीका केली नाही. उलट त्यांनी भाजप-शिवसेनेमधील सत्तासंघर्षाचा सामना पाहात होते. मात्र भाजपने शरद पवारांच्या अटी मान्य न केल्याने महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.

Visit : Policenama.com