Social Media App | 11 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये वाढला ‘या’ आजाराचा धोका, वेगाने पसरतोय हातपाय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Social Media App | जर तुमच्या मुलांचे वय 11 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि ते इंस्टाग्राम (Instagram) आणि स्नॅपचॅट (Snapchat) चा वापर करत असतील तर तुम्हाला अलर्ट राहण्याची आवश्यकता आहे. कारण सोशल मीडिया अ‍ॅप (Social Media App) मुलांना खर्‍या जीवनात मानसिकदृष्ट्या आजारी करत आहेत. तसेच अभासी जगात सुद्धा त्यांचा दुष्परिणाम दिसू लागला आहे. मुलांचे वागणे चिडचिडे आणि डिप्रेशनने भरले आहे.

 

‘ऑनलाइनच्या जगात हरवत आहेत मुले’ (Social Media App)
याबाबत अमेरिकन जर्नल ‘कम्प्यूटर इन ह्यूमन बिहेवियर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अलिकडच्या रिपोर्टकधील खुलासा जाणून घेवूयात… अनेक पालक आपली मुले अचानक चिडचिडी झाल्याने चिंता व्यक्त करतात. तसेच आता हे गुपित नाही की सोशल मीडियामुळे मुलांच्या शारीरीक आणि मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. आता यास नवनवीन अहवालात सुद्धा दुजारो मिळत आहे.

‘वेलस्ली सेंटर फॉर वूमेन’चा रिपोर्ट
अमेरिकन जर्नल ‘कम्प्यूटर इन ह्यूमन बिहेवियर’मध्ये प्रसिद्ध ‘वेलस्ली सेंटर फॉर वूमेन’च्या अलिकडील रिपोर्टनुसार, जर 11 वर्षापेक्षा छोट्या वयाची मुले या दोन अ‍ॅप्लीकेशन्सचा (Social Media App) वापर करत असतील तर ती डिजिटल किंवा व्हर्च्युअल जगात सुद्धा मुलांना चिडचिड आणि डिप्रेशनला बळी पाडत आहेत. म्हणजे खर्‍या जीवनात मुलांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतच होता आता व्हर्च्युअल म्हणजे अभासी जगात सुद्धा मुले चिडचिडी होत आहेत.

 

अमेरिकेची एक रिसर्च लॅब ‘वेलस्ली सेंटर फॉर वूमेन’ने उत्तर पूर्व अमेरिकेतील सुमारे 773 शाळांमध्ये सर्व वर्गातील आणि वयाच्या मुलांचा एक सर्वे केला. त्यावेळी अशाप्रकारचे गंभीर परिणाम आढळून आले.

 

Web Title :- Social Media App | your childrens are used to irritable do you know the reason behind this

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | होय, अजित पवारांबाबतचा ‘तो’ बार फुसका ! उपमुख्यमंत्र्यांना ना इन्कम टॅक्सची नोटीस, ना संपत्तीवर ‘टाच’; जाणून घ्या प्रकरण

Diabetes | दिवाळीत ‘डायबिटीज’च्या रूग्णांनी ‘या’ 7 गोष्टींकडे ठेवा लक्ष, अन्यथा वाढेल ब्लड शुगर

By-Election Results | देशात पोटनिवडणुकीचा संग्राम, जाणून घ्या कोणत्या राज्यात कोणी किती जागा जिंकल्या?

Modi Government | DA मध्ये पुन्हा झाली वाढ ! काही सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात करण्यात आली 12 टक्केपर्यंत वाढ

Amruta Fadnavis | ‘जागतिक कामांबद्दलचं ‘नोबेल’ गेलं; पण अमृता फडणवीस यांना भारतरत्न द्या’ – हरी नरके