कर्मचार्‍यांचे मनोबल वाढविण्यासाठी फेटा बांधून सर्वांचा सत्कार

अक्कलकोट : प्रतिनिधी –  आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी अक्कलकोट रिपाइं आठवले यांच्या वतीने त्यांचा फेटा बांधून शाल पांघरून सन्मान करण्यात आला.यावेळी डॉक्टरानी दिलेल्या सूचनांचे पालन सर्वानी जरूर केले पाहिजे असे आवाहन प्रा. राहुल रुही यांनी केले.
अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथील आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांचे मनोबल वाढवण्यासाठी रिपाइं(आठवले) गटाच्या वतीने डॉक्टर परिचारिका आणि इतर कर्मचारी या सर्वांचा सन्मान करण्यात आला .

केंद्रीय मंत्री रामदास आठवले व राजाभाऊ सरवदे यांचे दिवंगत मित्र रिपाइं नेते शांतमल सोनकांबळे यांच्या जन्मदिनानिमित्त राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपाइं अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांच्या नेतृत्वाखाली आज अक्कलकोटच्या ग्रामीण रुग्णालय येथे कार्यरत असणाऱ्या सर्व वैदयकिय अधिकारी,नर्स,ब्रदर्स,अंबुलन्स चालक वाहक,डॉक्टर कर्मचारी त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी रिपाइं नेते प्रा.राहुल रुही यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

आज कोरना सारख्या आजारात आपलं जीव धोक्यात टाकून आरोग्य कर्मचारी काम करत आहेत आजघडीला सर्वाधिक ताण यांच्यावर आहे आज समाजाने यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाला समाजातून हद्दपार करायचा असेल तर डॉक्टरांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वाचे कटाक्षाने पालन करावे लागेल आज स्वतः कुटूंबापासून दूर राहून हे सर्व चिकित्सक दूत म्हणून काम करत आहेत आज संपूर्ण समाजाचा विश्वास हा आरोग्य कर्मचारी यांच्यावर असून यांच्याकडे खूप आशेने पाहिले जात आहे अतिरिक्त काम ताण अपुऱ्या सुविधा यामध्येही हा वर्ग उत्कृष्ट काम करत आहेत प्रशासनाने व समाजाने यांचे मनोधैर्य वाढवले पाहिजे व त्याना साथ दिली पाहिजे

यावेळी अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकिय अधीक्षक डॉ.अशोक राठोड ,वैदयकिय अधिकारी डॉ.निखिल क्षीरसागर ,डॉ.सतीश बिराजदार ,नर्स- कुलकर्णी, चिंचोरे, सलगरे,कोकणे,
ब्रदर्स- गवंडी ,मुजावर, अल्लापुरे, संदीप बाळशंकर , शौकत शेख, यावेळी रिपाइं आठवले गटाचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, रिपाइं नेते प्रा राहुल रुही, शहर अध्यक्ष प्रसाद माने, युवक शहर अध्यक्ष आकाश माने, अजय मडिखांबे, रोहित वाघमारे, अमोल दुपारगुडे, निकेश मडिखांबे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते