पुण्यातील केशवनगर मध्ये बुद्ध जयंती अनोख्या पद्धतीने साजरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   भगवान गौतम बुद्ध यांची 2564 वी जयंती धम्मराज अशोक विचार व विकास मंच व धम्मदयाद बुद्ध विहार कमिटी केशवनगर यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली संपूर्ण जगात कोरोना सारख्या जीव घेण्या विष्णुने थैमान घातले आहे त्यामुळे जीव मुठीत धरून लोक जीवन जगत आहेत हातावर पोट असणारे मोलमजुरी धूनभांडी लेबर काम करणारी मंडळी जळजवळ दीड महिना घरात बसून आहेत आशा गरजू लोकांना कमीत कमी 15 दिवस जाईल असे अन्न धान्य वाटप केले .

अन्न दान हे श्रेठ दान हीच बुद्धाची शिकवण आहे याच वैशाखी पौर्णिमेला बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले होते जन्म ही याच दिवशी झाला व महापरिनिर्वाण देखील आजच्या दिवशी झाले होते म्हणून आजच्या पोर्णिमेला सर्व जगात महत्व दिले जाते याच अनुषंगाने भन्ते नागघोष महाथेरो दानाचे महत्व पटवून दिले मंडळाचे अध्यक्ष दीपक माने जितीन कांबळे महादेव दंदी रमेश गायकवाड यांनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले रमेश जमदाडे यांनी आभार मानले