‘या’ अभिनेत्रीची आई ‘बिकीनी’ घालणारी पहिली अ‍ॅक्ट्रेस , व्हॅक्सिंग करताना व्हायरल झाला होता MMS !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री सोहा अली खानने नुकताच आपला 41 वा वाढदिवस साजरा केला. सोहाचा जन्म प्रसिद्ध बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस शर्मिला टागोर आणि पटौदी खानदानातील नवाब मंसूर अली यांच्या घरी 4 ऑक्टोबर रोजी झाला होता. तिचे वडिल टायगर पटौदी भारताचे सर्वात यशस्वी क्रिकेट कॅप्टनपैकी एक आहेत. सोहाचा मोठा भाऊ सैफ अली खान बॉलिवूड अ‍ॅक्टर आहे तर तिची मोठी बहिण सबा अली खान एक ज्वेलरी डीझाईनर आहे.

सोहाने दिल्लीत ब्रिटीश स्कुल आणि ऑक्सफोर्डच्या बॅलिओल कॉलेजमधून शिक्षण घेतलं आहे. तिने लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून इंटरनॅशनल रिलेशनमध्ये मास्टर डिग्री घेतली आहे. सोहाची आई शर्मिला टागोर बॉलिवूडमधील पहिली अ‍ॅक्ट्रेस होती जिने सिनेमात बिकीनी घातली होती.

बॉलिवूडआधी सोहाने केलं बँकेत काम

बॉलिवूडमध्ये येण्याआधी सोहाने फोर्ड फाउंडेशन आणि सिटी बँकेत काम केलं आहे. यानंतर तिने 2004 साली दिल मांगे मोर या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं. परंतु हा सिनेमात बॉक्स ऑफिसवर विशेष चालला नाही. 2006 मध्ये तिला रंग दे बसंती सिनेमातील अ‍ॅक्टींगसाठी आयफाचा बेस्ट सपोर्टींग अ‍ॅक्टरचा पुरस्कार मिळाला होता.

हायली एज्युकेडेट अ‍ॅक्ट्रेस

सोहा बॉलिवूडमधील हायली एज्युकेटेड अ‍ॅक्ट्रेसपैकी एक आहे. ती एक लेखिकासुद्धा आहे. तिने एक पु्स्तकही लिहलं आहे. द पेरिल्स ऑफ बीइंग मॉडरेटली फेमस असं या पुस्तकाचं नाव आहे. अटा गलट्टा – बंगळुरू लिटरेचर फेस्टमध्ये 2018 साठी तिचं पुस्तक लोकप्रिय पुस्तक म्हणून निडवलं गेलं होतं.

करिअरविषयी थोडक्यात…

सोहाच्या करिअरबद्दल सांगायचे झाले तर, 2004 साली आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या सोहाने आधी बंगाली सिनेमात काम केलं होतं. इति श्रीकांता असं या सिनेमाचं नाव आहे. यानंतर तिने दिल मांगे मोरमधून बॉलिवूड डेब्यू केला होता. चाहत्यांनी तिला वाढदिवसासाठी खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Visit : Policenama.com