Solapur Crime | धक्कादायक ! पत्नीच्या चारित्र्यावर संशय, SRPF जवानाने केलेल्या गोळीबारात एक ठार दोन जखमी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन  पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन एका एसआरपीएफ जवानाने (SRPF Soldier) गोळीबार (firing) केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात (Solapur Crime) घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील (Solapur Crime) बार्शी (Barshi) तालुक्यातील भातंबरे (Bhatambare) गावात बुधवारी (दि.20) रात्री पावणे अकराच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू (one died on the spot) झाला असून दोनजण जखमी झाले आहेत. एसआरपीएफ जवानाला वैराग पोलिसांनी (Vairag police station) ताब्यात घेतलं आहे.

मुंबई येथे एसआरपीएफ जवान (Mumbai SRPF Jawan) म्हणून कार्यरत असणाऱ्या गोरोबा तुकाराम महात्मे (Goroba Tukaram Mahatme) याला आपल्या
पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता.
या संशयाचा राग मनात धरुन त्याच्या जवळील सरकारी पिस्टलने (Government Pistol) गोळीबार करुन नितीन बाबुराव भोसकर (Nitin Baburao Bhoskar) यांस ठार मारले.
तसेच बालाजी महात्मे याला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करुन गंभीर जखमी केले.
घटनेतील फिर्यादी काशिनाथ विश्वनाथ काळे व अमर जालिंदर काकडे या दोघांनाही गोळीबार करुन जिवे ठार मारण्याचा (Solapur Crime) प्रयत्न केला आहे.

 

या गोळीबाराच्या घटनेतील मृत नितीन बाबुराव भोसकर (रा. सापनई, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरला नेण्यात आला.
तर जखमी बालाजी महात्मे यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आरोपी गोरोबा भोसेकर याच्या विरोधात वैराग पोलीस ठाण्यात (Vairag police station) गुन्हा (FIR) दाखल करुन अटक
(Solapur Crime) करण्यात आली आहे.
पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेली एक सरकारी पिस्टल आणि 26 जिवंत काडतूस जप्त केली आहेत.
पुढील तपास वैराग पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Solapur Crime | srpf jawan fires at wife on suspicion of character one killed two injured incident happen in barshi taluka of solapur district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Corona vaccination in India | भारताचा ऐतिहासिक विक्रम ! कोरोना लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा पार

Quickly Earn Money | 10 हजार रूपये लावून सुरू करू शकता ‘हा’ व्यवसाय, दरमहा होईल 1 लाखापेक्षा जास्त कमाई; जाणून घ्या कशी?

Nandurbar Malnutrition News | नंदुरबारमध्ये सप्टेंबर महिन्यात 118 बालकांचा मृत्यू; प्रशासनाला ना सोयर ना सुतक