सोमेश्वर कारखान्याने सन 2019-20 च्या अंतिम ऊसदर प्रतिटन 3500 रूपये द्यावा : सतिश काकडे

नीरा पोलिसनामा ऑनलाईन – श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०१९ – २० या हंगामासाठी ऊसाचा अंतिम दर ३ हजार ५०० प्रतिटन जाहिर करून उर्वरित ६०० रूपये प्रति मे.टन कोणतीही कपात न करता दस-यापुर्वी सभासदांच्या बँक खात्यावर एकरक्कमी वर्ग करावी अशी मागणी पुणे जिल्हा शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी निवेेेदनाद्वारे कारखान्याकडे केली आहे.

काकडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि, श्री सोमेश्वर सह.साखर कारखान्याने गाळप हंगाम सन २०१९-२० मध्ये ९ लाख ३४ हजार ७८४ मे.टन ऊसाचे गाळप केले असून११.८६ टक्के साखर उतारा मिळविला आहे. तसेच ११ लाख ८ हजार ९५० एवढी साखर पोती उत्पादित करून जिल्ह्यात एक नंबरचा क्रमांक मिळविला आहे असे संचालक मंडळाचे म्हणणे आहे.मागील कालावधी तील संचालक मंडळाने चुकीच्या धोरणांमुळे सुमारे २६८ कोटी रूपये कर्ज करून ठेवले होते व त्या कर्जातून मुक्त झाल्याचे संचालक मंडळ श्रेय घेत असले तरी सभासदांच्या ऊस बिलाच्या पैशातूनच कारखाना कर्जमुक्त झाला आहे.

कारखान्याचे चेअरमन यांनी मुरूम ( ता. बारामती ) येथील सभेत ‘चांगला दर देऊ’ असे आश्वासन दिले होते. त्यावेळी बहुतांश सभासदांनी ‘अब की बार साडेतीन सौ’ पार अशी मागणी त्यावेळी केली होती. परंतु त्यावर आजपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला दिसत नाही. चेअरमन यांनी बॉयलर अग्नि प्रतिपदन कार्यक्रमात कारखान्याच्या विस्तारीकरणाची माहिती दिली. मात्र सन २०१९-२० च्या अंतिम ऊस बिला संदर्भात बोलले नाहीत. म्हणुन कृती समितीला संचालक मंडळाकडे मागणी करावी लागत आहे.

दिवाळीनंतर सभाासदांना मुुलांंची शिक्षण फी, शेेेतीची मशागत, ऊस बांधणी, बी-बियाणे खरेदी व लग्न सराई अशा अनेक गोष्टींना सामोरे जावे लागणार असल्याने त्यांना पैशांची आवश्यकता आहे. तसेच कोरोना महामारीमुळे सगळीकडेच संकट उभे राहिले आहे.त्यातच अवकाळी व परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची उभी पिके वाया गेली आहेत.कारखान्याने सन २०१८- १९ या हंगामात ३ हजार ३०० रूपये प्रति मे.टन अंतिम भाव दिलेला आहे. त्या हंगामाच्या तुलनेत सन २०१९-२० च्या हंगामात साखर विक्री चढ्या भावाने केलेली आहे. उपपदार्थांचे उत्पादन व विक्री जादा झालेली आहे तसेच वीज विक्री सुध्दा चांगली झालेली आहे. तसेच सभासदांच्या ऊस बिलातुन २० कोटी रूपये कपात करून ऊस दर देण्यासाठी चढउतार निधी निर्माण केलेला आहे. तो ऊसदरासाठी वापरता येतो. त्यामुळे सन २०१९-२० हंगामाचा अंतिम ऊस दर ३ हजार ५०० रूपये प्रति मे.टन देण्यास कारखान्यास काहीही अडचण नाही. आत्तापर्यंत कारखान्याने २ हजार ९०० रूपये अदा केले आहेत. उर्वरित ऊस बिलाची ६०० रूपये प्रति मे.टन रक्कम कोणतीही कपात न करता एकरक्कमी दसऱ्या दरम्यान सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करावी अशी मागणी काकडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.