कधी ‘काऊगर्ल’ तर कधी ‘पास्ता’ नेकलेस, ‘लॉकडाऊन’मध्ये अशा भन्नाट लुकमध्ये दिसतेय ‘बेबो’ करीना !

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड स्टार करीना कपूर गेल्या अनेक दिवसांपासून आपला आगामी सिनेमा लाल सिंह चड्ढामुळे चर्चेत आहे. सध्या कोरोन व्हायरसमुळं करीना घरातच आहे. अशात करीनाचे काही फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होताना दिसत आहेत. करीनानं इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत. फोटोतून दिसत आहे की, लॉकडाऊनच्या काळात करीना कसा वेळ घालवत आहे आणि कशा प्रकारे वेगवेगळे लुक करत आहे.

करीनानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले होते ज्यात ती वेगवेगळ्या अंदाजत तयार झालेली दिसत आहे. तिच्या या वेगवेघळ्या लुकला तिनं वेगवेगळं नावही दिलं आहे. करीना एका फोटोत काऊगर्ल लुकमध्ये दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं ऑफ व्हाईट रंगाचा शर्ट आणि रिप्ड डेनिम घातली आहे. काऊगर्ल बूटही कॅरी केले आहेत. काऊबॉय हॅट घालून तिनं लुक पूर्ण केला आहे.

एका फोटोत करीना काफतान घालून दिसली. मागे एकदा तिनं तैमूरसाठी एक पास्ता नेकलेस बनवला होता. हा नेकलेस तिनं स्वत: घातला होता ज्याचा फोटोही तिनं सोशलवर शेअर केला होता.

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा अंग्रेजी मीडियम हा सिनेमा 13 मार्च 2020 रोजी रिलीज झाला आहे. कोरोनामुळं सध्या सारं काही ठप्प झालं आहे. त्यामुळं काही दिवसांनंतर हा सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे. याशिवाय ती तख्त सिनेमातही काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा 2021 मध्ये रिलीज होणार आहे. करीनाकडे लाल सिंह चड्ढा हा सिनेमाही आहे.

https://www.instagram.com/p/B-hNbL6F17F/

https://www.instagram.com/p/B-eG7wWFnAK/

https://www.instagram.com/p/B-eGxWvFK5D/

https://www.instagram.com/p/B-eGl43ld3D/

https://www.instagram.com/p/B-eFc08lEYq/

https://www.instagram.com/p/B9lftg9FZNg/

https://www.instagram.com/p/B9YpIm5F1EV/

https://www.instagram.com/p/B9YkPI5Fr3u/

https://www.instagram.com/p/B8y7ba5F1Rw/