‘कधी ना कधी अखंड भारत आम्हाला घ्यायचाय’, भाजपच्या ‘या’ नेत्यानं ठणकाऊन सांगितलं (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कधी ना कधी अखंड भारत आम्हाला घ्यायचाय असं वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं आहे. रविवारी वसईत झालेल्या एका सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सीएएवर भाष्य केलं. यावेळी बोलताना शेलारांनी सीएएवरील शिवसेनेची भूमिका तसेच इतर अनेक विद्यार्थी संघटनांवरही भाष्य केलं.

वसईतील सभेत बोलताना आशिष शेलार म्हणाले, “कधी ना कधी अखंड भारत आम्हाला घ्यायचाय ती भूमिका आमची आहे तो विषय वेगळा आहे. परंतु आज जर सीएएच्या कायद्याची भूमिका मांडायची झाली तर जो प्रतारीड आहे आणि 2014 पूर्वीचा आहे, ज्याला जगात अन्य कुठे नागरिकत्व मिळणार नाही आणि तो इथं खित्पत पडला आहे त्याला नागरिकत्व देण्याचं आहे. अशी नागरिकता देणं जर गुन्हा असेल तर इंदिरा गांधीजींच्या काळात युगांडातून आलेल्या त्या प्रताडित नागरिकांना कशी नागरिकता दिली. आज हा प्रश्न ज्यावेळेस उपस्थित केला जातो त्यावेळेस सीएएला विरोध करणारे मात्र त्याचं उत्तर देत नाहीत.” असंही शेलार म्हणाले.

पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले, “इथल्या काही संघटना विशेष करून दुर्भाग्यानं मुस्लिम संघटना ज्यांना भडकवण्यात आलं असेल किंवा विशेषत: काँग्रेस आहे.” असंही ते म्हणाले.