सोनाक्षीने कुटुंबियांबाबतीतच केला ‘हा’ मोठा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माझ्या खासगी आयुष्यात माझे आई-वडिल, माझे मित्र नातेवाईक कोणीच मला स्टार असल्यासारखं वागवत नाही असा खुलासा आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने केला आहे. १७ एप्रिल रोजी तिचा मल्टीस्टार चित्रपट कलंक रिलीज होत आहे. यात सोनाक्षीची महत्त्वाची भूमिका आहे.

एका मुलाखतीत बोलताना सोनाक्षी म्हणाली की, “मी नेहमी तेच करते जे मला आवडतं. मी प्रत्येक सिनेमात असं काम करते जसं तो माझा सिनेमा आहे. माझ्यासाठी प्रत्येक सिनेमा नवीन असतो.”

पुढे बोलताना ती म्हणते की, “मी माझ्या भूमिकेला नेहमीच समजून घेण्याचा प्रयत्न करते. मी माझ्या रोलमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असते कारण माझी भूमिका त्यामुळे बनावटी वाटत नाही. कलंक ही माझी या वर्षातील पहिलीच फिल्म आहे. यानंतर माझ्या तीन फिल्म येणार आहेत. सर्व फिल्मध्ये माझा रोल वेगळा आहे.”

याशिवाय सोनाक्षी म्हणते की, “मी तासनतास शुटींग करते तरी मी थकत नाही. उलट मला काम करताना खूप मजा येते. मी काम करताना एन्जॉय करत असते. हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे.” असे तिने सांगितले.

Loading...
You might also like