मतदान न केल्याने ‘ट्रोल’ झालेल्या अक्षयचा ‘तो’ खोटेपणा उघड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यंदाच्या लोकसभच्या निवडणूकीला सर्व अभिनेत्री व अभिनेते यांनी आवर्जुन मतदान केले. यांचे फोटो व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. मात्र, बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने मतदान न केल्यामुळे त्याला युजर्सने खुप ट्रोल केले. त्याच्या अनेक चाहत्यांनी देशभक्तीवरील प्रश्न उपस्थित केल्याने हा मुद्दा खुपच चिघळला. युजर्सला अक्षयने प्रत्युत्तर देत म्हटले की, मागील ७ वर्षात कधीट कॅनडाला गेलो नाही. पण एका युजर्सने हा खोटेपणा उघड केला.

एका युजर्सने काही स्क्रिनशॉट ट्विट केले आहे. यामध्ये एका हॉटेलमध्ये पार्टीत अक्षय सहभागी झाला आहे. ही पार्टीचे आयोजन टोरांटो येथे करण्यात आले होते. यामध्ये अक्षयसोबत राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी, राहुल खन्ना देखील दिसून आले. या पार्टीचे ट्विट १० मार्च २०१४ मधील असल्याचे युजरने सिद्ध केले.

ज्यावेळी देशभक्तीवरुन वाद झाला तेव्हा अक्षयने एका पोस्टमध्ये लिहले की, हे देखील तितकेच खरे आहे की, मागील ७ वर्षात मी कधीही कॅनेडाला गेलो नाही. मी भारतात काम केले आहे. आणि भारतातील सर्व टॅक्स भरले आहे. इतक्या वर्षात मला माझ्या देशाबद्दल प्रेम व्यक्त करण्याची आवश्यकता नाही. मला याची खंत वाटते की, माझ्या नागरिकत्वावर कारण नसताना वाद निर्माण केला जात आहे. हे प्रकरण माझे खाजगी, कायदेशीर आणि राजकीय आहे. या वादाची कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीशी देणे-घेणे नाही. मी या देशाच्या भल्यासाठी आपले योगदान देत राहिन. पण युजरच्या ट्विटवरुन अक्षयला नव्या वादाचा सामना करावा लागणार आहे.

तर दुसऱ्या ट्विटच्या स्क्रीनशॉटमध्ये टीना विरमानी हिच्यासोबत गाणे गात असल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे अक्षय कुमार खोटो बोलत असल्याचा आरोप युजरने केला आहे.

You might also like