लॉकडाऊन मध्ये ‘देवदूत’ बनलेल्या सोनू सूदला मिळाला ‘हा’ सन्मान

पोलिसनामा ऑनलाईन : लॉकडाऊन दरम्यान एकीकडे लोक मोठ्याप्रमाणात कोरोना व्हायरसमुळे त्रस्त होते, तर दुसरीकडे बेरोजगारी त्यांचे आयुष्य सतत कठीण करत होती. लॉकडाऊनचा सर्वात मोठा परिणाम परप्रांतीय कामगार आणि गरीबांवर झाला. अशा अडचणीच्या परिस्थितीत या क्षणी अभिनेता सोनू सूद लोकांसाठी देवदूत म्हणून आला आणि मदतीचा हात पुढे केला.

स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी नेण्यापासून,मुलांना मोफत शिक्षण आणि उपचार देण्यास सोनू सूद याने कोणतीही कसर सोडली नाही. यामुळेच त्याला आज लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान आहे. त्याने केलेल्या या सामाजिक कार्याबद्दल त्यांला संयुक्त राष्ट्र संघाचा प्रतिष्ठित एसडीजी विशेष मानवतावादी कृती पुरस्काराने सन्मानित (SDG Special Humanitarian Action Award) करण्यात आले आहे.

सोमवारी झालेल्या या आभासी सोहळ्या दरम्यान संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमात सोनू सूद याचा सन्मान करण्यात आला. या विशेष सन्मानानंतर सोनू सूद याने मनोगत व्यक्त करतांना म्हटले की “मी कोणतीही आशा न ठेवता आपल्या देशवासीयांसाठी जे माझ्याकडून करता येईल ते मी केले. हा शनमाण केल्याबद्दल मला चांगले वाटत आहे.”अशातच सोनू सूद यांनी परप्रांतीयांच्या मदतीची काळजी घेतली

यामुळे केली सोनू सूद याने प्रवास्यांना मदत
लॉकडाऊन दरम्यान काही दिवस परप्रांतीयांना जेवणाचे पाकिटे वाटत असतांना प्रवाशांच्या वाहतुकीची व्यवस्था करण्याची कल्पना या अभिनेत्याची मनात आली. जेवण वाटप करताना, तो १० दिवसाचे जेवण घेणाऱ्या मुलांच्या कुटूंबाला भेटला, जेव्हा ते सर्व त्यांच्या मूळगावी बंगळुरूला जायला निघाले तेव्हा सोनू सूदने सांगितले की आपण वाहतुकीची परवानगी घेण्याचा प्रयत्न करू,जेणेकरून त्यांना पायी चालण्यापासून रोखता येईल.हा विचार करून त्यांनी पुढील योजना आखल्या.

दररोज शेकडो लोकांना त्यांच्या घरी परत पाठविणारा सोनू सूद सांगत होता की, “त्यावेळी मी ३५० लोकांना पाठवू शकलो असतो. हाच मुख्य उद्देश होता. मला जाणवलं की मी आणखी काही लोकांना पाठवू शकतो.” जे वाहतुकीच्या अभावी पायी चालण्याची योजना करत होते. त्यानंतर मी मागे वळून पाहिलेच नाही. “

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like