आई ‘श्रीदेवी’ची आठवण काढताना जान्हवी कपूर ‘इमोशनल’, फोटो शेअर करत म्हणाली, ‘मी रोजच…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय सिनेमांची जान आणि दिग्गज कलाकार श्रीदेवी हिची आज दुसरी डेथअ‍ॅनिव्हर्सरी आहे. अशात तिची आठवण काढत तिची मुलगी आणि बॉलिवूड स्टार जान्हवी कपूरनं एक फोटो पोस्ट केला आहे. यासोबत जान्हवीनं एक इमोशनल नोट लिहिली आहे. सध्या जान्हवी बॉलिवूडमध्ये आपला जम बसवण्याचा प्रयत्न करत आहे. जान्हवीच्या लुकमुळं अनेकदा तिची श्रीदेवीसोबत तुलनाही होताना दिसत असते. श्रदेवीचा मृत्यू जान्हवी कपूर धडक सिनेमाच्या शुटींमध्ये बिजी असताना झाला होता. त्यावेळी कपूर कुटुंबासोबतच पूर्ण देश सुन्न झाला होता.

श्रीदेवीच्या दुसऱ्या डेथ अ‍ॅनिवर्सरीनिमित्त एका लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. फोटो पोस्ट करताना फोटोच्या कॅप्शनमध्ये जान्हवी म्हणते, “मी रोजच तुला मिस करत असते.” सध्या जान्हवीची ही पोस्ट सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

श्रीदेवीच्या अचानक मृत्यूनंतर जान्हवी कपूरनं हिंमत आणि समजदारीनं काम केलं. आपल्या आईचं स्वप्न तिनं पूर्ण केलं. तिनं धडक सिनेमासोबत धमाकेदार बॉलिवूड डेब्यू केला. आज इंडस्ट्रीत जान्हवीची वेगळी ओळख आहे.

शेवटच्या क्षणी जान्हवी नव्हती सोबत

दु:खद बाब अशी की, श्रीदेवीच्या शेवटच्या क्षणी जान्हवी कपूर तिच्यासोबत नव्हती. यावेळी जान्हवी मुंबईत आपल्या धडक या डेब्यू सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त होती. जान्हवीला या गोष्टीचं कायमच दु:ख वाटतं.

https://www.instagram.com/p/B6hlF4bgriK/