राज्यराखीव दलाच्या गाडीला अपघात; २० जवान जखमी

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन – गडचिरोली येथे बंदोबस्ताच्या कामासाठी जाणाऱ्या जवानांच्या गाडीला पुसद येथे अपघात झाला. यामध्ये २ जवान गंभीर, तर १८ जवान किरकोळ जखमी झाले आहेत. हिंगोली येथील राज्यराखीव बल गट क्रमांक – १२चे ३५ जवान गडचिरोली येथे वाहनाने बंदोबस्तासाठी जात होते.

यावेळी उमरखेड-पुसद रोडवरील सांडवा-मांडवा येथे समोरील वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालक अरविंद पवार यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिली. वाहन रस्त्याच्या कडेला उभे करण्याच्या प्रयत्नात वाहन पलटी झाले. या अपघातात वीस जवान जखमी झाले आहेत.

वाघाचा शेतकऱ्यावर हल्ला, शिर केले धडावेगळे

सचिन पवार, बाबुराव पवार, जुबेर काजीमिया, ज्ञानदेव तोते, प्रदीप माने,प्रकाश सुर्यतळ, मनोज माने, भगवान चव्हाण, नागेश कांबळे, अतुल रदवे, अरविंद पवार, मेहमूद शेख, नागेश मोरे, कैलास चौधरी, राजेश फुलावरे, नंदू भानुसे, संदीप गायकवाड, पांडुरंग गुहाळे अशी जखमी झोलल्य जवानांचा समावेश आहे. अपघातानंतर जखमींना बाहेर काढण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मदत केली. जखमी जवानांवर पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार बचावकार्यासाठी पुसेगाव पोलिसांशी संपर्क साधला होता.