IPS अधिकारी विनय तिवारींना 2 दिवसात मुंबई सोडण्याचे आदेश

पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी तपास करण्यासाठी आलेले बिहार शहर पूर्वचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना अखेर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना दोन दिवसांत मुंबई सोडण्याचे आदेश मुंबई पालिकेने दिले आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत असताना बिहार सरकारने तपास आपल्याकडे वर्ग करावा अशी मागणी लावून धरली. त्यासाठी बिहारचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी हे मुंबईत 2 ऑगस्ट रोजी दाखल झाले होते. मुंबईत आल्यावर त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. आज अखेर विनय तिवारी यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बिहार पोलिस यांनी तिवारी यांना पुन्हा येण्यास परवानगी मागितली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेकडून तिवारी यांना काल रात्री उशीरा दिले. त्यामुळे 8 ऑगस्ट आधी महाराष्ट्रातून पुन्हा बिहार जावे, अशी सूचनाही पालिकेने दिली आहे. लॉकडाउन नियमावलीनुसार, सात दिवसात एखाद्या अत्याआवश्यक कामासाठी आलेली व्यक्तीला मुळगावी जाता येते. पण सात दिवसाचा आत जर गेले नाही तर मात्र, त्या व्यक्तीस चाचणी करणे आणि पुढील सात दिवस क्वारंटाइन राहावे लागेल. या नियमांमुळे आणि बिहार पोलिसांनी केलेल्या विनंती अर्ज विचार करून बीएमसीने तिवारी यांना डिसचार्ज दिला आहे.