ST Bus Price Hike | एसटीचा प्रवाशांच्या खिशावर डल्ला, ऐन दिवाळीत भाडेवाढ, जाणून घ्या नवे दर

मुंबई : ST Bus Price Hike | एसटी महामंडळाने नेहमीप्रमाणे दिवाळीनिमित्त भाडेवाढ करत प्रवाशांच्या खिशावर डल्ला मारला आहे. ऐन दिवाळीत एसटी महामंडळाने शिवनेरी (Shivneri) वगळता अन्य सर्व प्रकारच्या बसेसच्या भाड्यात १० टक्के हंगामी वाढ केली आहे. ही भाडेवाढ ८ नोव्हेंबरपासून लागू झाली आहे. ज्यांनी आधीच आरक्षण (Reservation) केले असेल त्यांना प्रवास करताना भाडेवाढीच्या (ST Bus Price Hike) फरकाची रक्कम द्यावी लागणार आहे.

दिवाळीत प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने एसटी कमाई करण्याच्या दृष्टीने प्रवाशांची नेहमीच पिळवणूक करत असते. मागील अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. अगोदरच प्रवास भाडे प्रचंड वाढले असताना पुन्हा दिवाळीत प्रवाशांची लुटमार करण्याचा हा प्रकार संतापजनक आहे. इतर खाजगी वाहतुकीचे दर देखील न परवडणारे आहेत.

दिवाळीतील गर्दीच्या हंगामात महसूल वाढीसाठी २७ नोव्हेंबरपर्यंत तात्पुरती भाडेवाढ एसटी गाड्यांमध्ये लागू करण्यात आली आहे. दिवाळी हंगामापूर्वी आरक्षण केलेल्या प्रवाशांना आरक्षण तिकीट आणि वाढीव भाडेदर यांतील फरकाचे पैसे प्रवास करताना वाहकांकडे द्यावे लागणार आहे. दरम्यान, दिवाळीत खासगी ट्रॅव्हल्सकडून देखील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लुटमार करण्यात येते. (ST Bus Price Hike)

एसटी आणि खासगी बसचे तिकीट दर

मार्ग / साधी /शयनयान / वातानुकूलित / शिवनेरी / खासगी बस एसी / शयनयान

मुंबई-नाशिक ३०० ४३५ ४६५/५७५ ५००/६००

मुंबई-पुणे २७० ३६५ ४२०/५२० ५००/६००

मुंबई-कोल्हापूर ६२५ ९१५ ९७० १०००/१५००

मुंबई-कणकवली ७४० १,०८५ १,१५० १३००/१९५०

मुंबई-सावंतवाडी ८०५ १,१८० १,२५५ १५००/३२४०

  • एसटी दर सुधारित भाडेवाढीनुसार
  • एसटी बसश्रेणी/खासगी बस प्रकारानुसार दरात बदल अपेक्षित.
  • ऑनलाइन आरक्षण करताना आरक्षण शुल्काचा समावेश असल्याचे दरात वाढ अपेक्षित

(स्रोत : एसटी महामंडळ, ऑनलाइन आरक्षण संकेतस्थळ)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap Case News | 5 हजाराच्या लाच प्रकरणी पुरंदर तालुक्यातील तलाठी अन् पंटर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | आई व मुलीला जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण, खडकीतील प्रकार; एकाला अटक

Ananya Panday Airport Look | अनन्या पांडेच्या कॅज्युअल एअरपोर्ट लूकनं चाहत्यांच वेधलं हृदय…!