Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील कोंढव्यात पतीनेच पत्नीचे अश्लिल फोटो केले व्हायरल; जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पती-पत्नीच्या नात्यात अनेकदा इतरांनी पाहू नये, असे फोटो काढले जातात. जोपर्यंत त्यांच्या नात्यात गोडवा असतो, तोपर्यंत ते ठिक असते. परंतु, काही कारणामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण होतो, अशावेळी सूड घेण्याची भावना निर्माण होते. (Pune Crime) त्यातून मागचा पुढचा विचार दूर पडतो आणि एकांत क्षणाचे फोटो व्हॉटसअ‍ॅपवर व्हायरल (Viral On WhatsApp) होतात. असे एका पतीने आपल्या पत्नीचे अश्लिल फोटो वेगवेगळ्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर शेअर केले. ही बाब पत्नीला समजल्यावर तिने कोंढवा पोलिसांकडे (Kondhwa Police) फिर्याद दिली आहे.

कोंढवा पोलिसांनी उंड्री (Undri) येथे राहणार्‍या 38 वर्षाच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 33 वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2014 पासून आजपर्यंत सुरु असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी यांच्या पतीने त्यांचे अश्लिल फोटो तसेच स्वत:चे अश्लिल व्हिडिओ वेगवेगळ्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर शेअर करुन फिर्यादी (Pune Crime) यांची बदनामी केली. सहायक पोलीस निरीक्षक दगडे (API Dagade) अधिक तपास करीत आहेत.

आरोपीने नेमकं असं का केलं या बाबत कोंढवा पोलीस तपास करत आहेत.

Web Titel :- Pune Crime | husband wife matter of kondhwa area. Husband send wife photos on whatsapp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police | पुण्यातील ‘या’ पोलीस स्टेशनमधील कर्मचारी निलंबित; यापूर्वी त्याच प्रकरणात झाली होती अधिकाऱ्यावर कारवाई

Parbhani Gang Rape | परभणीतील सोनपेठ तालुक्यात 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार ; पीडितेने उचलले ‘हे’ पाऊल

Nagar Pune Highway Accident | नगर-पुणे महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; पिता-पुत्रासह 4 जण जागीच ठार