ST Driver Suicide | धक्कादायक ! आणखी एका ST चालकाची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – ST Driver Suicide | मागील काही दिवसांपासून राज्यभर एसटी कामगारांचा संप (ST Workers Strike) सुरू आहे. यामुळे राज्यात गोंधळ उडाल आहे. यापुर्वी एसटी चालकांनी एसटीतच आत्महत्या (ST Driver Suicide) केल्याच्या दोन ते तीन घटना समोर आल्या होत्या. आजही एक नाशिकमधील (Nashik) धक्कादायक घटना समोर आली आहे. सततच्या चर्चेमुळे आणि मागण्या मान्य न झाल्यामुळे नैराश्यात गेलेल्या एका एसटी कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. गहिनाथ गायकवाड (Gahinath Gaikwad) असं आत्महत्या केलेल्या कामगारांचे नाव आहे.

 

याबाबत माहिती अशी, नाशिकच्या पेठ आगारातील गहिनाथ हे एसटी कर्मचाऱ्यांचं सुरु असलेल्या आंदोलनात देखील सहभागी झाले होते. ते मूळचे बीड येथील रहिवासी आहेत. कमी पगार आणि कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या या टोकाच्या (ST Driver Suicide) निर्णयामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबात 1 वर्षाचा मुलगा आणि पत्नी आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, गहिनाथ गायकवाड यांच्या आत्महत्येनंतर त्यांचे काही सहकारी आक्रमक झाले. त्यांनी राज्य सरकारवर (Maharashtra Government) सडकून टीका केली आहे. “हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. ते आणखी किती कर्मचाऱ्यांचा बळी घेणार?” असा सवाल गायकवाड यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल न घेणाऱ्या या सरकारचा आपण निषेध करत असल्याचं देखील म्हटलं आहे.

 

Web Title :- ST Driver Suicide | st employee commits suicide in nashik msrtc strike ST Driver Suicide

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या पाचशेच्या आत, गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 45 रुग्णांचे निदान; जाणून घ्या इतर आकडेवारी

Legislative Council Election | शिवसेनेचा एकाच दगडात निशाणा? एकनिष्ठ राहणाऱ्यांना आमदारकी तर रामदास कदमांना बाहेरचा रस्ता

PF Nominee | ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या करू शकता आपल्या PF नॉमिनीमध्ये बदल; EPFO सांगत आहे ‘स्टेप बाय स्टेप’ प्रोसेस

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 113 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी

Nawab Malik |’समीर वानखेडे अल्पवयीन असताना त्यांना दारुच्या दुकानाचा परवाना’; मलिकांचा खळबळजनक आरोप (व्हिडिओ)

Sharad Pawar | ‘या’ कारणामुळं मोदी सरकारनं कृषी कायदे मागे घेतले – शरद पवार