ST Workers Strike | ‘मी खुर्चीत असतो तर…’, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरुन नाना पटोलेंनी व्यक्त केली नाराजी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) सुरु आहे. त्यावर राज्य सरकारने (State Government) तोडगा काढून कर्मचाऱ्यांचे पगार वाढ (Salary increase) केली. परंतु विलिनीकरणाच्या (Merger) मागणीसाठी काही कर्मचारी अद्यापही संपावर (ST Workers Strike) ठाम असल्याने एसटी महामंडळाने त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मी खुर्चीत असतो तर एसटी आंदोलन इतके दिवस चाललं नसतं असे भाष्य करत आपल्या नाराजीला वाट मोकळी करुन दिली.
नाना पटोले आज बुलडाणा जिल्ह्यातील (Buldhana District) खामगावच्या (Khamgaon) दौऱ्यावर आहेत. शेगाव (Shegaon) येथून खामगावच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांनी रस्त्यात सुरु असेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी नाना पटोले यांना निवेदन दिले. यावेळी पटोले यांनी आपण खुर्चीत असतो तर एसटी आंदोलन (ST Workers Strike) एवढे दिवस चालले नसते असे कर्मचाऱ्यांना सांगितले. यावर कर्मचाऱ्यांनी पटोले यांना प्रतिप्रश्न केला. कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले यांनी आपल्या नाराजीला वाट मोकळी करुन दिली.
आता ही आपण सत्तेत आहात आपण करु शकता, असा प्रतिप्रश्न संपकरी कर्मचाऱ्यांनी नाना पटोले यांना केला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, आम्ही सत्तेत असलो तरी आमची सत्तेतील आस का आहे हे तुम्हाला चांगलं माहीत आहे? यावरुन काँग्रेस नेमकी सत्तेत कशासाठी आहे? एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न पटोले यांना समजले की नाही? नेमकं त्यांना काय म्हणायचे होते? यावर एसटी कर्मचारी संभ्रमात पडले.
दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, आमच्यावर ज्या प्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे, तशीच ती सर्वसामान्य जनतेची ही आहे. त्यामुळे एसटी कामगारांनी संप आणखी ताणून धरु नये. त्यांनी कामावर परत यावे. दोन महिन्याचा पगार मिळाला नाही तर एसटी कर्मचाऱ्यांचेच नुकसान होणार आहे. यात कोण्या नेत्याचे नुकसान होणार नाही. आता बडतर्फीची कारवाई सुरु झाली असून ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल असे परब यांनी सांगितले.
Web Title :- ST Workers Strike | congress leader nana patole reaction on st msrtc worker protest buldhana district khamgaon
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 75 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
Rohit Pawar | … म्हणून फडणवीसांकडून भीतीपोटी CBI चौकशीची मागणी – रोहित पवार