कुर्ला टर्मिनसमधून 523 स्टार कासव जप्त

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन

कुर्ल्यातील लोकमान्य टिळक टर्मिनलमध्ये एका महिलेला अटक करण्यात आली. या महीलेजवळुन, अतिशय दुर्मिळ आणि वन्यजीव कायद्यांतर्गत बंदी असलेले स्टार प्रजातीच्या कासव जप्त करण्यात आले आहे. एक, दोन नव्हे तर तब्बल ५२३ स्टार प्रजातीच्या कासवांची तस्करी ही महीला करत होती.

आंध्र प्रदेशातून आलेली ही महीला गुरुवारी एलटीटी स्टेशनवर उतरली. तिथुन ती मुंबई, नवी मुंबई, ठाणे अशा विविध ठिकाणी या कासवांची डिलिव्हरी होणार होती. सापळा रचुन वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो आणि ठाणे वन्यजीव विभागाच्या डीव्हीजनने या महिलेला कासव तस्करी केल्या प्रकरणी अटक केले आहे. सदर महिलेला ११ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कासव घरात पाळणे शुभ असते अशी अंधश्रध्दा आहे. तसेच फेंगशुईमध्ये सुध्दा कासवाला महत्त्व आहे. पाठीवर सोनेरी रंगाची चांदणी असलेल्या कासवांना काही जण शुभ मानतात. तर, जादुटोण्यासाठी सुध्दा काहीजण याचा वापर करतात.

जाहिरात

महात्मा गांधींचा देखावा करुन एक लाखांचे बक्षीस मिळवा !

जाहिरात

[amazon_link asins=’B06XFLY878,B01KSXQNLS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2a58cb85-b35e-11e8-b494-8b94a81d159b’]