निगडी प्राधिकरण येथील स्टेट बँकेला आग

ADV

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निगडी प्राधिकरण धन्वंतरी हॉस्पिटल समोरील शाखेला आज (मंगळवार) पहाटे पाचच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमध्ये बँकेतील साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले असून यामुळे बँकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे पाचच्या सुमारास प्राधिकरण येथील धन्वंतरी हॉस्पिटल समोर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच प्राधिकरण अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत दोन तासात आग आटोक्यात आणली. मात्र तोवर आगीमध्ये बँकेतील साहित्य जळून खाक झाले होते. ज्यामुळे बँकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. निगडी पोलीस तपास करत आहेत.