भारतीय स्टेट बँकेचे वतीने कर्ज नूतनीकरणाचा मेळावा !

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन  –  भारतीय स्टेट बँकेच्या नायगाव शाखेच्यावतीने दत्तक गावामध्ये पिक कर्ज नूतनीकरण मेळावा आयोजित करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणुण घेऊन तात्काळ कर्ज उपलब्धतेमुळे शेतकऱ्या मध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

सर्वसामान्य माणसांची कामे वेळेवर होत नाहीत असे पूर्वी म्हणायचे पण आता सर्व काही बदल झाला आहे शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही कारण बँकेतील अधिकारी ठराविक दिवस ठरवून त्या गावातील विविध योजनेचे वाटप,पिक कर्ज नूतनीकरण इत्यादी काम कमी वेळात व्हावी आणि यात आर्थिक घोडेबाजार होऊ नये याची खबरदारी घेत आहेत.स्टेट बँकेत शेतकऱ्याच्या दारात अशी कार्यक्रमाचे आयोजन लालवंडी,मोरईकळी,पळसगाव अशा गावात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्वरित कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे शेतकरी दलालांच्या तावडीतून सुटका झाली आहे.

यावेळी नांदेड येथील आर.बी. ओ.डि.एच.एच‌.नांदेड येथील (चीफ मॅनेजर) रोडे साहेब,शेतकरी अधिकारी कीरण चाडोलकर,नायगावची कर्तव्यदक्ष व शेतकरी अधिकारी भास्कर सोमाजी चाचरकर,सयोगी सुधाकर संत्रे,CSP प्रतिनीधी राम मोरे या मेळाव्यात सहभागी असलेले गावचे सरपंच युवराज पा.लालवंडे,तंटामुक्त अध्यक्ष पद्मवार सावकार, बळवंत शिंदे, राहूल जोंधळे, प्रताप बोमनाळे, व्यंकट पवार, गजानन गुरू पवार, मोहन पा जाधव, गौतम जोंधळे, सतिश केरूरे, शंकर जोंधळे, गणपती जोंधळे, रमेश लालवंडे, शिवाजी केरूरे, रामराम निकलपुरे, व अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.