ऑनलाइन SBI नेट बँकिंगशिवाय देते अनेक सुविधा, घरबसल्या तात्काळ होतील तुमची ‘ही’ कामे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – आजकाल सर्वांच्या दिनचर्येचा इंटरनेट एक भाग झाला आहे. सोशल मीडियापासून आपले ऑफिस व अन्य कामांशिवाय बँकिंगची कामेसुद्धा घरबसल्या ऑनलाइन होतात. भारतीय स्टेट बँकेचे कस्टमर्स आपल्या बँकिंग सेवांसाठी अधिकृत वेबसाइटवर आपले काम करतात. परंतु, तुम्हाला हे माहित का, देशाच्या या सर्वात मोठ्या बँकेच्या वेबसाइटवर खात्याशी संबंधीत कामाशिवाय अन्य अनेक सेवा सुद्धा मिळतात, ज्यामुळे तुमची इतर कामेसुद्धा सहज होऊ शकतात.

एसबीआय आपल्या 15,000 शाखा आणि अनेक फायनान्शियल प्रोडक्टद्वारे कस्टमर्सला सेवा देते. याशिवाय अनेक अशा सेवा आहेत, ज्याचा लाभ एसबीआयच्या वेबसाइटवर मिळू शकतो, या सेवांबद्दल जाणून घेवूयात…

लॉकडाऊनच्या दरम्यान ऑनलाइन फ्रॉडमध्ये वाढ झाली आहे. अनेक लोकांमध्ये पैशांची संबंधीत काम करताना ऑनलाइन सर्व्हिसेसबाबत थोडी शंका येत असते. मात्र, ऑनलाइन फ्रॉड आणि याच्या सुरक्षेबाबत एसबीआय पूर्ण सावधगिरी बाळगते.

एसबीआयच्या ऑनलाइन पोर्टलद्वारे तुम्ही डायरेक्ट टॅक्स (ओएलटीएएस), इनडायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स (कस्टम्स) जमा करू शकता. डायरेक्ट टॅक्समध्ये टीडीएस, इनकम टॅक्स , कॉर्पोरेशन टॅक्स, सिक्युरिटी ट्रान्जक्शन टॅक्स, हॉटेल रिसिप्ट टॅक्स, एस्टेट ड्यूटी, इंटरेस्ट टॅक्स, वेल्थ टॅक्स, एक्सपेंडीचर टॅक्स, गिफ्ट टॅक्स, कॅश ट्रान्जक्शन टॅक्स आणि फ्रिंज बेनिफिट टॅक्सचा समावेश आहे. जर तुम्ही एक टॅक्सपेयर म्हणून एसबीआयच्या वेबसाइटच्या माध्यमातून इन डायरेक्ट टॅक्स जमा करत असाल तर यासाठी तुमच्याकडे बँक अकाऊंट आणि नेट बँकिंग सुविधा असायला हवी.

डीमॅट अकांउट
एसबीआय कस्टमर्स शेयर बाजारात ऑनलाइन ट्रेडिंगसाठी डीमॅट अकाऊंट सुद्धा उघडू शकतात. हे डीमॅट अकाऊंट एसबीआय कॅप सिक्युरिटीज लिमिटेडचे असेल. डीमॅट अकाऊंट उघडण्यासाठी युजर्सना एसबीआय वेबसाइटवर जावे लागेल. येथे एसबीआय कॅप सिक्युरिटीज लिमिटेडमध्ये अकाऊंट उघडण्यासाठी एक अ‍ॅप्लीकेशन सबमिट करावे लागेल. हे अ‍ॅप्लीकेशन एसबीआयच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

या सुविधांचा सुद्धा लाभ
याशिवाय, एसबीआय आपल्या पोर्टलवरून एनपीएस अकाऊंट उघडण्याची सुद्धा सुविधा देते. जर तुमच्याकडे एसबीआयचा इंटरनेट बँकिंग आयडी आणि त्यामध्ये कमीतकमी एक ट्रान्जक्शन केले असेल तर तुम्ही फिक्स्ड डिपॉजिट सुद्धा उघडू शकता. एसबीआय अकाऊंट होल्डर्स नेट बँकिंगच्या मदतीने ई-एफडी उघडू शकतात.