SBI नं आजपासून लागू केला ATM मधून पैसे काढण्यासाठीचा नवीन नियम, OTP शिवाय नाही निघणार कॅश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआय-स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, आता कोणत्याही एटीएममधून पैसे काढणे आता अधिक सुरक्षित आहे.एसबीआय एटीएममधून 10 हजार किंवा त्याहून अधिक रुपये काढल्यास ओटीपी (एसबीआय एटीएम ओटीपी सेवा) नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठविला जाईल. त्यानंतरच पैसे काढणे शक्य होईल.

आजपासून म्हणजेच १८ सप्टेंबरपासून हा नियम लागू झाला आहे. स्टेट बँकेने यापूर्वीच हा नियम लागू केला होता.१८ सप्टेंबरपासून २४ तासासाठी हे राबविले जात आहे. सद्य नियमानुसार, ओटीपी प्रक्रिया ही सकाळी ०८ ते रात्री ०८.०० दरम्यान लागू राहणार. यामध्ये रक्कम प्रविष्ट केल्यानंतर ओटीपी स्क्रीन उघडेल आणि आपल्याला आपल्या मोबाइल नंबरवर पाठविलेला ओटीपी मशीन मध्ये प्रविष्ट करावा लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच व्यवहार शक्य होतील.

ओटीपीशिवाय पैशे बाहेर येणार नाही – जर ग्राहकाकडे नोंदणीकृत मोबाईल नंबर नसेल तर तो एसबीआय एटीएममध्ये त्याच्या एसबीआय डेबिट कार्डमधून 10 हजाराहून अधिक पैसे काढू शकणार नाही. अशा वेळी त्याने आपला अद्ययावत क्रमांक लवकरात लवकर नोंदवून घ्यावा.

एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता मोबाईल घेऊन जाणे आवश्यक आहे – एसबीआयने आपल्या ग्राहकांना सांगितले आहे की,जर तुम्ही एसबीआय कार्ड वापरुन एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी जात असाल तर मोबाइल घेऊन जा.हे समजून घेण्याची आवश्यकता आहे की ओटीपी आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठविला जाईल. ओटीपी टाकल्यानंतरच आपण 10 हजार किंवा त्याहून अधिक रुपये काढू शकाल. याबाबत बँकेने ग्राहकांना एसएमएसही पाठविला आहे.

बँकेने का लागू केला नवीन नियम – एसबीआयच्या मते स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना एटीएम घोटाळ्यापासून वाचवण्यासाठी २४ तासांची ओटीपी आधारित सेवा सुरू केली आहे. नवीन नियम १८ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.हा नियम फक्त एसबीआय डेबिट कार्ड धारकांना लागू असेल.