मंत्रिमंडळ विस्तार : नवरात्रौत्सवात खडसेंना देवी पावणार?

मुंबई : पोलीसनामा

राज्य मंत्रिमंडळावर विस्तार हा सध्या चेष्टेचा विषय झाला आहे. त्यावर आता सत्ताधारी पक्षातील आमदारही उपरोधिकपणे बोलू लागले आहेत. परंतु, आता पितृ पंधरवड्यानंतर शेवटचा मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा मुहूर्त ठरवला जात असलयाचे वृत्त आहे. कोणत्या मंत्र्यांना डच्चू द्यायचा हे ठरविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचे प्रगतीपुस्तक तपासण्याचा निर्णय घेतला आहे.

चार वर्षांतील पाच लोकहिताची कामे सांगा; मुख्यमंत्र्यांचे सर्व विभागांना निर्देश

[amazon_link asins=’B01DDP7D6W,B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c250db81-be20-11e8-950b-373d2bb0a9e4′]

राज्य सरकारला ऑक्टोबरमध्ये चार वर्षे पूर्ण होत आहेत. लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्यासाठी अवघे पाच महिने उरले आहेत. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरमध्ये मुंबईत सुरू होणार आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी नवरात्रौत्सवाचा मुहूर्त शोधण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मंत्रिमंडळ विस्ताराला होकार दिला आहे. ते परदेशातून मुंबईत परतल्यानंतर विस्तार होणार असल्याचे समजते. या मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री शिवसेनेला खूष करण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे.

शिक्षकांना गुजराती चॅनेलवरुन धडे देण्याचा शिक्षण विभागाचा विनोदी निर्णय

भाजपची काही मंत्रिपदे रिक्त आहेत. तसेच, काही मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय व जातीय समीकरणे समोर ठेवून विस्तार होऊ शकतो. मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी भाजपकडून अनेकजण इच्छुक आहेत. माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचेही ठरले आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या खास मर्जीतले आहेत. त्यामुळे शेलार यांनाही संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.