26/11 मुंबई हल्ला : कसाबला जिवंत पकडल्या प्रकरणी तुकाराम ओंबळेंना मरणोत्तर ‘पदोन्नती’ मिळणार

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन – २६/११ रोजी मुंबई वर मुंबई वर झालेल्या दहशदवादी हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांनी आपले प्राण गमावले. या हल्लात पोलिसांनीही प्राणांची बाजी लावून लोकांचं रक्षण केलं आणि आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडलं. यातील १४ अधिकाऱ्यांना राज्य सरकारने पदोन्नती देण्याचं घोषित केलं आहे.यातील शहीद तुकाराम ओंबळेंना कसाबला जिवंत पकडल्या प्रकरणी मरणोत्तर पदोन्नती मिळणार आहे.

२६/११ च्या हल्ल्या वेळेस दहशदवाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,ओबेरॉय हॉटेल आणि ताज हॉटेल या जागांवर प्रचंड गोळीबार करण्यात आला होता. त्यात भरपूर लोकांना आपले प्राण गमवावे लागले. अजमल कसाबही या दहशदवाद्यामध्ये होता. कसाब टॅक्सी मधून जात असताना तुकाराम ओंबळे यांनी या टॅक्सी ला अडवलं आणि कसाबला पकडलं मात्र कसाबने ओंबळे यांच्यावर गोळीबार केला.स्वतःवर गोळीबार होऊनही तुकाराम ओंबळे यांनी अडवलं आणि कसाबला पकडलं. त्यात त्यांना वीरमरणआलं. त्यांच्यामुळे कसाबला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आलं. त्यांच्या या
शौर्या मुळे त्यांना ‘अशोक चक्र’ प्रदान करण्यात आलं होत.

त्यांच्यासोबत इतर १४ पोलीस अधिकारीहि होते त्यांच्या या शौर्या साठी त्यांना शौर्य पदकाने गौरवण्यात आलं होत. आता सरकार या १४ पोलीस अधिकाऱ्यांना आणि अंमलदारांना राज्य सरकार एक टप्पा पदोन्नती देणार आहे. यात शहिद तुकाराम ओंबळे यांचाही नाव आहे. त्यांना राज्य सरकार मरणोत्तर पदोन्नती देणार आहे. यासंबधीची माहित गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.