‘बाळ कधी पासून कंटेन्मेंट झोनमध्ये काम करता, काळजी घ्या’ ! गृहमंत्री अनिल देशमुख यांनी साधला कर्मचार्‍यांशी ‘संवाद’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – “बाळ” कधी पासून कंटेंमेंटमध्ये काम करता. काळजी घेत जावा. पोलीस ठाण्यात सर्व सुविधा आहेत का ? तुम्हाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आवश्यक लागणारे सॅनीटायझर, मास्क, फिल्डशेक यासह सर्व साहित्य दिले आहे का. ते वापरत जा आणि स्वतःची काळजी घेत जा, आपुलकीने विचारपूस करत राज्याच्या गृहमंत्र्यांनी कंटेंमेंट झोनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याशी सवांद साधला.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आज पुणे दौऱ्यावर असून, त्यांनी यावेळी बंदोबस्तावरील कर्मचाऱ्याशी संवाद साधला. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यासह येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे अजय वाघमारे हे उपस्थित होते. विमानतळावर आगमन झाल्यानंतर गृहमंत्री देशमुख हे येरवडा येथील अनाभाऊ साठे महामंडळ ई लर्निंग स्कुल येथे भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याशी सवांद साधला.

गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून पोलीस दल कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी 24 तास काम करत आहे. त्यात कंटेंमेंट झोन असणाऱ्या ठिकाणी बंदोबस्त करत आहेत. येरवडा येथील गुंजन चौकात पालिकेच्या वतीने आण्णाभाऊ साठे ई-लर्निंग स्कुलमध्ये कोरोना चाचणी केंद्र सुरू केलेले आहे. त्याठिकाणी पोलीस येरवडा पोलीस ठाण्यातील कर्मचारी बंदोबस्त करत आहेत.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे भेट देऊन कर्मचाऱ्याशी सवांद साधला. यावेळी किती दिवसापासून येथे बंदोबस्त करत आहात. तसेच काळजी घेण्यासाठी सर्व आवश्यक गोष्टी देण्यात आल्या आहेत का. काळजी कशी घ्यायची याची माहिती आहे का. तसेच मास्क, सॅनीटायझर यासह सर्व सुविधा मिळतात का अशी विचारपूस केली. तसेच काळजी घेत जा. मास्क आणि सॅनी टायझरची बॉटल खिशातच ठेवत जावा. ते लावत जा अशी मार्गदर्शन देखील केले. यावेळी कर्मचाऱ्यानी त्यांना सर्व सुविधा उपलब्ध असून काळजी घेतो असे सांगितले. यानंतर गृहमंत्री तेथून ताडीवाला राडत्यावरील पोलि