राज्य साखर संघाचे अध्यक्ष नागवडे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

नगर : पोलीसनामा ऑनलाईन

राज्य साखर संघाचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव उर्फ बापूसाहेब नागवडे (८५) यांचे बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मुंबईतील लिलावती रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज गुरुवारी (२० सप्टेंबर) दुपारी साडेबारा वाजता वांगदरी (ता. श्रीगोंदे) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’be1ffea7-bc85-11e8-8400-2d165ef5215a’]

नागवडे हे वृद्धापकाळाने मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबई येथील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व दीपकशेठ नागवडे आणि तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (कै.) नागवडे यांच्या सूनबाई अनुराधा नागवडे या नगर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आहेत.

राजेश मारू मृत्यूप्रकरणी रूग्णालयासह राज्य सरकारला म्हणणे मांडण्याचे आदेश

१९ जानेवारी १९३४ रोजी आजोळी कर्जत तालुक्यातील रुईगव्हाण येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी मूळ गाव असलेल्या वांगदरी (श्रीगोंदे) गावचे सरपंचपद ते महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदापर्यंत अनेक महत्त्वाची पदे भूषवली. १९७८ मध्ये अडीच वर्षे व १९९९ मध्ये पाच वर्षे ते श्रीगोंद्याचे आमदार होते. तालुक्यात पहिला सहकारी साखर कारखाना व श्रीछत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली. राज्य साखर संघाच्या अध्यक्ष म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनिय होती.

लैँगिक अत्याचार झालेल्या ‘त्या’ मुलीचा अखेर मृत्यू