अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर ‘सेंसेक्स’ची गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठी ‘उसळी’, 1600 अंकांची ऐतिहासिक ‘वाढ’, रूपया देखील ‘वधारला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी कंपन्यांना टॅक्समध्ये मोठी सूट देण्याची घोषणा केल्यानंतर भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शेअर मार्केटमधील बॉम्‍‍‍‍बे स्‍टॉक एक्‍सचेंज म्हणजेच BSE सध्या 1,844.63  अंकाने वाढून 37,929.89 अंकावर पोहोचला आहे. त्याचबरोबर  NSE मध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढला असून 525.35 अंकांची वाढ होऊन 11,230.15 अंकावर थांबला आहे. यामुळे मागील दहा वर्षांमधील सर्वात जास्त वाढ सेन्सेक्समध्ये आढळून आली आहे. आज झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत अर्थमंत्र्यानी  कॉर्पोरेट कंपन्यांवरील टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता या कंपन्यांवर केवळ 22 टक्के टॅक्स लागणार आहे.

5.82 लाख कोटी रुपयांचा फायदा
शेअर बाजारात आलेल्या तेजीमुळे गुंतवणूकदारांचा मोठा फायदा झाला असून जवळपास 5.82 लाख कोटी रुपयांचा सर्वांना फायदा झाला आहे. कंपन्यांच्या शेअरमध्ये झालेल्या वाढीमुळे हा फायदा झालेला आहे.

हा आली शेअर बाजारात तेजी
कॅपिटल सिंडिकेटचे मॅनेजिंग डायरेक्टर  सुब्रमण्यम पशुपति यांनी बोलताना सांगितले कि,मागील अनेक कालावधीपासून कंपन्या मिनिमम अल्‍टरनेट टॅक्स हटवण्याची मागणी करत होते. त्यामुळे हा टॅक्स आणि करामध्ये घट आल्याने कॉर्पोरट कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे. या सर्व घडामोडींमुळे शेअर बाजारात तेजी आली आहे.

visit: Policenama.com

You might also like