‘EPFO’ कर्मचारी आणि पेंशनरसाठी खुशखबर ! आता उपचार होणार ‘कॅशलेस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेंशनरला मेडिक्लेमची सुविधा देण्याची तयारी करत आहे. उत्तरप्रदेशसह सर्व प्रादेशिक क्षेत्रीय आयुक्तांना ईपीएफओ मध्ये कार्यरत कर्मचारी, पेशनरबरोबर त्यांच्या सहकार्यांचा तपशील पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात विशेष म्हणजे सर्व उपचार कॅशलेस होतील.

आतापर्यंत निश्चित करण्यात आलेल्या रुग्णालयात उपचार करण्यासाठी खर्च देण्यात येत होता, पहिल्यांदा रुग्णांना उपचारासाठीची रक्कम खर्च करावी लागत होती, त्यानंतर बिल फाइल केल्यानंतर परतावा मिळत असे. पेंशनरचा फक्त शहरातील 3 रुग्णालयात उपचार केल्यास खर्चातील बिलाच्या रक्कमेचा परतावा मिळत होता.

वयाच्या 25 नंतर मुला मुलीला मिळणार नाही उपचार –

कर्मचारी भविष्यनिर्वाह संघटनेकडून यासाठी प्रोफार्मा देण्यात येत होता ज्यात सर्व तपशील द्यावा लागत होता. मुख्यालयाचे आयुक्त डॉ. शिवकुमार यांनी सूचना पाठवल्या आहेत. मेडिक्लेमच्या अंतर्गत कर्मचारी आणि पेंशनरच्या घरातील चार सदस्यांना उपचार मिळत होते परंतू आता मुलगा मुलगी वयाच्या 25 नंतर उपचारात मिळणाऱ्या मेडिक्लेममधून बाहेर होतील. म्हणजेच त्यांना त्या अंतर्गत लाभ मिळणार नाही.

ही योजना सुरु होण्याआधीच ईपीएफ फेडरेशन आणि स्टाफ युनियनने विरोध करण्यास सुरुवात केली. त्यांचे म्हणणे आहे की आरोग्य भत्ता मिळत राहावा आणि नव्या योजना आल्या तर विरोध नाही मात्र मेडिक्लेमच्या आड भत्ता बंद झाला तर शांत बसणार नाही. फेडरेशनचे सल्लागार राजेश शुक्ल आणि उपाध्यक्ष उमेश शुक्ल यांच्या मते भत्त्या बाबत कोणतीही माघार घेणार नाही. भत्ता चालू राहिला पाहिेजे.

 

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like