PM मोदींनी लाल किल्ल्यावरून कठोर संदेश देताच ‘ड्रॅगन’ आला लाईनवर, चीन म्हणतंय – ‘एकमेकांचा करायचा सन्मान’

बिजिंग : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वांतत्र्य दिनाच्या भाषणावर चीनने प्रतिक्रिया दिली आहे. चीनी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, चीन भारतासोबत आपसातील विश्वास वाढवणे आणि मतभेद दूर करण्यासाठी तयार आहे. दोन्ही देशांसाठी योग्य मार्ग म्हणजे एकमेकांचा सन्मान करणे होय. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या त्या भाषणावर प्रतिक्रिया दिली, ज्यामध्ये पीएम मोदी यांनी भारतीय सशस्त्र दले मजबूत असणे आणि देशाची अखंडता सर्वोच्च असण्याबाबत वक्तव्य केले होते. मोदींनी म्हटले होते की, आपल्या देशाचे शूर जवान काय करू शकतात, ते लडाखमध्ये जगाला दाखवून दिले आहे. एलओसीपासून एलएसीपर्यंत, ज्या देशांनी नजर वर करून पाहिले, त्यांना भारताच्या जवानांनी तोडीसतोड उत्तर दिले.

मोदींनी आपल्या भाषणात म्हटले होते की, भारताच्या सार्वभौमत्वाचा सन्मान आमच्यासाठी सर्वोच्च आहे. या संकल्पासाठी आमचे जवान आणि देश काय करू शकतो हे लडाखने जगाला दाखवून दिले आहे, असे मोदी म्हणाले. पूर्व लडाखमध्ये गलवान खोर्‍यात जूनच्या मध्यावर भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक हाणामारीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. पीएम मोदी यांच्या भाषणावर टिपण्णी करताना चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिजियन यांनी म्हटले की, आम्ही पंतप्रधान मोदींचे भाषण पाहिले आहे. आम्ही शेजारी आहोत. आम्ही जवळचे शेजारी आहोत, आम्ही सर्व एक अरब लोकांसह मोठे होणारे देश आहोत.

झाओ यांनी सोमवारी मंत्रालयाच्या नियमित ब्रीफिंगमध्ये म्हटले, यासाठी द्विपक्षीय संबंधांच्या विकासातून दोन लोकांच्या हितासह हे क्षेत्र आणि पूर्ण जगाची स्थिरता, शांती, समृद्धी सुद्धा होईल. दोन्ही पक्षांसाठी योग्य मार्ग म्हणजे एकमेकांचा सन्मान करणे आणि समर्थन करणे हा आहे, कारण हे आपल्या दिर्घकालीन हितांना पूर्ण करते. राजकीय विश्वास वाढवणे, मतभेद दुरूस्त करण्याचे व्यवस्थापन करणे आणि द्विपक्षीय संबंधांचा विकास निश्चित करण्यासाठी भारतासोबत काम करण्यास आम्ही तयार आहोत.

चीनी मीडियाने केले मोदींच्या भाषणाचे विश्लेषण
तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे विश्लेषण चीनी मीडियाने केले आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, चीनच्या संदर्भात आता हे महत्वपूर्ण आहे की, तो पुढे काय करतो. शांघाय इन्स्टीट्यूट फॉर इंटरनॅशनल स्टडीजचे एक संशोधक झाओ यांनी चीन सरकारचे मुखपत्र ’ग्लोबल टाइम्स’ला सांगितले होते की, 8 ऑगस्टला बिजिंग आणि नवी दिल्लीच्या दरम्यान वरिष्ठ सैन्य स्तरीय चर्चेनंतर, भारताने आपली दिशा बदलण्याचा कोणताही संकेत दिलेला नाही. यासोबतच चीनने सुद्धा आपली जमीनीवरील पकड मजबूत ठेवली आहे. जसे की, दोन्ही देश आता सुद्धा प्रमुख मुद्द्यांवर तणावात आहेत, पीएम मोदी यांचे हेतू पुढील पावलावरून समजू शकतात.