लडाख प्रकरण : सॅटेलाइट छायाचित्रं जारी करून आपलीच बदनामी करून बसला चीन, भारताचा दावा मजबूत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  चीनच्या सरकारी टीव्ही चॅनलने लडाख मुद्द्यावर काही अशी छायाचित्रे प्रसारित केली, ज्यामुळे भारताचा दावा आणखी मजबूत झाला. लडाख संघर्षात आपली पाठ थोपटण्याचा चीनचा डाव त्यांच्यावरच उलटला आहे. तर, या छायाचित्रांनी भारताच्या त्या गोष्टीला बळ मिळाले, ज्यामध्ये म्हटले होते की, गलवान खोर्‍यात मे महिन्याच्या सुरूवातीला चीनी सैनिकांनी भारतीय सीमेत जवानांची हालचाल रोखण्याचा प्रयत्न केला होता.

चीनचा सरकारी टीव्ही चॅनल सीसीटीवी-4 वर सॅटेलाइट छायाचित्रे दाखवली गेली, ज्यामध्ये गलवान नदीच्या पेट्रोलिंग पॉईंट 14 वर भारतीय हेलीकॉप्टर पॅड आणि कॅम्प होते. हे पश्चिम हिमालयावर समुद्र सपाटीपासून 14 हजार फुट उंचीवर आहे. यापूर्वी, 15 जूनला भारत-चीन सैनिकांमध्ये हिंसक मारहाण झाली होती, यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते.

चीनमध्ये प्रसारित करण्यात आलेल्या सॅटेलाइट छायाचित्रांद्वारे हे समजले नाही की, ती कोणत्या तारखेची आहेत, परंतु एलएसीवर भारताकडून पेट्रोलिंग पॉईंट 14 वर भारतीय सैनिक आणि नवनिर्मित हेलीपॅड दिसत आहेत. यातून स्पष्ट होत आहे की, चीनी सैनिकांद्वारे भारतीय बांधकाम आणि सैनिकांच्या मागे करणात आले होते. तर, 25 जूनच्या नंतरच्या सॅटेलाइट छायाचित्रांमध्ये तेथे चीनी बांधकाम दिसून आले होते. भारत नेहमी म्हणत आला आहे की, गलवान नदी किनार्‍याचा प्रदेश आमचा आहे, जो पेट्रोलिंग पॉईंट 14 पर्यंत जातो.

संघर्षाच्या ठिकाणावरून मागे सरकू लागली दोन्ही सैन्य

गलवान खोर्‍यात ज्या ठिकाणी दोन्ही सैन्यांमध्ये मारहाण झाली तेथून भारत-चीनचे सैन्य मागे सरकू लागले आहे. दोन्ही देशांचे प्रमुख लष्करी अधिकार्‍यांची बैठक आणि एनएसए अजीत डोभाल व चीनी परराष्ट्र मंत्री यांच्यातील चर्चेनंतर दोन्ही सैन्यांनी मागे सरकण्याचा निर्णय झाला आहे. लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, आपसातील सहमीतनंतर, दोन्ही पक्षांना संघर्ष झालेल्या ठिकाणावरून एक ते दिड किलोमीटर मागे सरकावे लागेल. दोन्ही सैन्यांकडून सैन्य कमी करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर चर्चा होऊ शकते. तर, सैन्य कमी करण्याचे हे काम काही दिवसात पूर्ण करण्यात येईल.