ऋचा चड्ढा आणि अली फजलनं मॅरेज रजिस्ट्रेशनसाठी दिला अर्ज, ‘या’ महिन्यात होणार ‘धुमधडाक्यात’ लग्न

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार अली फजल आणि ऋचा चड्ढा फुकरे (Fukrey) सिनेमात एकत्र दिसले होते. या सिनेमानंतर त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. अलीकडेच त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. एका ताज्या रिपोर्टनुसार आता अली आणि ऋचानं मॅरेज रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय केलं आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात दोघं विवाहबद्ध होणार आहेत.

https://www.instagram.com/p/B6xTGtTF48N/

दोन्ही स्टारच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका कोर्टात दोघांनी रजिस्ट्रेशनसाठी अर्ज दिला आहे. प्रवक्त्यानं सांगितलं की, सध्या फक्त लग्नाच्या रजिस्ट्रेशनची तारीख घेण्यात आली आहे. एप्रिलेच्य शेवटच्या आठवड्यात ते अधिकृत रजिश्ट्रेशन करण्याच्या तयारीत आहेत. यानंतरच समारंभ होतील. आम्ही एवढंच सांगू शकतो की, आनंदाचे क्षण आहेत. सध्या दोन्ही स्टार्स आपल्या आपल्या कामात व्यस्त आहेत. दोघंही 31 मार्चपर्यंत आपापलं शुटींग शेड्युल पूर्ण करून लग्नाच्या तयारीला लागणार आहेत. चाहत्यांनाही त्यांच्या लग्नाची आतुरता आहे.

2012 साली आलेल्या फुकरे (Fukrey) सिनेमादरम्यान अली फजल आणि ऋचा चड्ढा यांची मैत्री झाली. यानंतर 2015 मध्ये दोघे एकमेकांना डेट करू लागले. 2017 मध्ये 74 वा वेनिस फिल्म फेस्टीवल झाला. यावेळी दोघांनी आपलं नातं पब्लिक केलं. दोघांनी आतापर्यंत दोन सिनेमात एकत्र काम केलं आहे. फुकरे (2013) आणि फुकरे रिटर्न्स (2017) असे हे दोन सिनेमे आहेत.

मालदीवमध्ये असताना अली फजलनं ऋचाला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. ऋचानंही विलंब न लावता अलीला लग्नसाठी होकार दिला होता. अलीकडेच अशी माहिती समोर आली होती की, अली आणि ऋचा 15 एप्रिल रोजी लग्न करण्याचं मन बनवत आहेत. लग्नाच्या काही काळ आधीच कपलनं आपल्या लग्नाच्या बातमीवर शिक्कमोर्तब केलं होतं.