24 पोलिसांची लाखोंची ‘कमाई’ पोलिसानेच जमा केली पत्नीच्या खात्यात, 3 वर्ष चालू होतं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 24 पोलीस कॉन्स्टेबलचे भत्ते आपल्या पत्नीच्या खात्यात पाठवणाऱ्या कॉन्स्टेबलला गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. 36 वर्षीय आरोपी अनिलवर 19.44 लाख रुपयांमध्ये अफरातफरी केल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांचे वेतन अ‍ॅक्सिस बँकेत जमा होते. बँकेला आर्थिक भत्त्यांच्या बाबत काहीतरी घोटाळा झाला असल्याचे सांगण्यात आले होते आणि याबाबत तक्रारही देण्यात आली होती. तक्रारीमध्ये सांगण्यात आले होते की, काही पोलिसांच्या भत्यांमध्ये गडबड झालेली आहे. त्यानंतर बँकेने तपासणी केली असता हे आढळून आले की अकाउंट सेक्शन मध्ये असलेल्या अनिल यांनी यात गडबड केली आहे.

गुन्हा दाखल करून अटक केली –
पुढे जेव्हा सविस्तर तपास केला गेला तेव्हा हे समजले की, अनिल नेहमीच काही पोलिसांच्या भत्त्यांना आपल्या पत्नीच्या खात्यावर ट्रान्सफर करत आहे. यानंतर पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यांर्गत मंगळवारी तक्रार दाखल केली आहे.

तीन वर्षांपासून सुरु होती गडबड –
2016 पासून अकाउंट सेक्शन अनिल सांभाळत आला आहे आणि तो निवासी भत्त्याचा हिशोब ठेवत असे. तो बँकेला योग्य व्यक्तीची माहिती देण्याऐवजी आपल्या पत्नीची माहिती देत होता. बँक इलेकट्राॅनिक सिस्टीमच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करत असे आणि हिशोबाच्या कागदावर अनिल लिहिताना मात्र योग्य अकाउंट नंबर लिहीत असे त्यामुळे आतापर्यंत तो पकडला गेला नव्हता.

आरोपीच्या पत्नीची देखील होणार चौकशी –
पोलिसांनी सांगितले की, अनिलच्या पत्नीची देखील याबाबत चौकशी होणार आहे. तसेच पोलीस याचीही चौकशी करणार आहेत की अनिल च्या पत्नीने खात्यात आलेले पैसे खर्च केले आहेत का ? जर तसे असेल तर पत्नीलाही अटक केले जाऊ शकते.

बँक कर्मचारी सुद्धा सहभागी असल्याचा संशय
पोलिसांनी सांगितले की, या घोटाळ्यादरम्यान बँकेत कामकाज पाहणाऱ्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी करण्यात येणार आहे. कारण पोलिसांना संशय आहे की यात काही बँक कर्मचारी सुद्धा समाविष्ठ असू शकतात.

Visit : Policenama.com