COVID-19 : रोहित शर्माचे ट्वीट – महाराष्ट्र सरकार, BMC आणि एमपॉवरने मिळून ‘मेंटल हेल्थ हेल्पलाईन’ नंबर केला जारी

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि उपकर्णधार रोहित शर्माने एक ट्विट शेअर केले आहे. कोविड-१९ महामारीमुळे भारतात लॉकडाऊन लागू आहे. लॉकडाऊन दरम्यान महाराष्ट्र सरकार, बीएमसी आणि एमपॉवर 1 ऑन1 ने मिळून एक हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. रोहितने ट्विटरद्वारे हा हेल्पलाईन नंबर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘महाराष्ट्र सरकार, बीएमसी आणि एमपॉवर 1 ऑन1 ने या संकटकाळात लोकांना मदतीसाठी एक फ्री हेल्पलाईन सुरु केली आहे. 1800-120-820050 नंबरवर कॉल करून तुम्ही मेंटल हेल्थ प्रोफेशनल सोबत बोलू शकता.’ या व्हायरसमुळे आतापर्यंत देशात २३०० लोकं संक्रमित झाली असून ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

जगभरात १० लाख पेक्षा अधिक लोकं या आजाराने ग्रस्त आहेत. कोविड -१९ च्या महामारीमुळे जगातील बर्‍याच देशांमध्ये लॉकडाउन लागू आहे. सर्व लोकं त्यांच्या घरात बंद आहेत. अशा परिस्थितीत लोकं मानसिक आरोग्य बिघडू शकते आणि अशा लोकांना मदत करण्यासाठी हा फ्री हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.