दिलासादायक ! राज्यातील ‘कोरोना’मुळे मृत्यू होण्याचे प्रमाण घटले, 4.76 % वरून 3.49 % वर

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण देखील मागील महिन्यात अधिक होते. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 4.76 टक्क्यावरून 3.49 पर्यत खाली आले आहे. याच कालावधीत 22 एप्रिल रोजी 269 जणांचा मृत्यू झाल्यानंतर गुरुवारी (दि. 21 मे) मृतांचा संख्या 1454 झाला. 22 एप्रिल रोजी राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 5649 होती त्यावेळी मृत्यूचे प्रमाण 4.76 टक्के होते. तर 21 मे रोजी राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 41642 झाली त्यावेळी मत्यूचे प्रमाण 3.49 टक्के होते.

शनिवारपर्यंत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 44582 इतकी झाली आणि मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1517 झाली. महाराष्ट्रातील मृत्यूचे प्रमाण गेल्या एक महिन्यापासून सतत खाली येत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार 22 एप्रिल रोजी मृत्यूचे प्रमाण 4.76 टक्के, 26 एप्रिल रोजी 4.24 टक्के, 30 एप्रिल रोजी 4.37 टक्के, 1 मे रोजी 4.22 टक्के, 9 मे रोजी 3.85 टक्के, 14 मे रोजी 3.7 टक्के आणि 21 मे रोजी मृत्यूचा दर 3.49 टक्के झाला.

या कालावधीत 22 एप्रिल रोजी कोरोना चाचण्यांची सख्याही सुमारे 89 हजारावरून वाढून 3.22 लाखांवर गेली होती. नायर हॉस्पिटलचे माजी मायक्रोबायोलॉजिस्ट माधव साठे यांनी सांगितले की, मृत्यू होत असले तरी मृत्यूचा दर कमी होत आहे ही चांगली गोष्ट आहे. एकूण चाचणी आणि पॉझिटिव्ह प्रकरणांची एकूण संख्याही वाढली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, जितका विषाणूचा प्रसार जास्त तितका धोकादायक होईल. त्यामुळे तो अधिक पसरले परंतु तो कमी धोकादायक असेल. तसेच मृत्यूचा दर कमी होण्याचे कारण देखील लवकरच समजेल.

दरम्यान, देशात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात झाल्याचे पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण 44585 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी 12583 लोक बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यं राज्यात कोरोनामुळे 1517 लोकांचा मृत्यू झाला आहे.