पत्नीचे दात ‘वाकडे-तिकडे’ असल्यानं पतीनं उचललं ‘हे’ पाऊल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैदराबादमध्ये एका महिलेला तिच्या वेड्यावाकड्या दातांमुळे मोठ्या प्रमाणात छळ सहन करावा लागत आहे. तिचे दात एका सरळ रेषेत नसल्याने तिच्या पतीने तिला घटस्फोट दिला. रुखसाना बेगम असे या पीडित महिलेचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, तिचा पती आणि सासरचे तिच्याकडे हुंड्याची मागणी करत होते.

त्यानंतर तिला मोठा प्रमाणात मारहाण देखील करण्यात आली. 27 जून 2019 रोजी तिचे लग्न झाले असून मागील काही महिन्यांपासून तिचा पती मोठ्या प्रमाणात तिचा छळ करत आहे. त्याचबरोबर दात वेडेवाकडे असल्याने त्याने तिला थेट घटस्फोट दिला आहे. एके दिवशी तिने आपल्या पतीला फोन केला असता त्याने आता तुझा आणि माझा काही संबंध नसल्याचे म्हणत थेट तिला तलाक दिला. त्यामुळे आता तिने आपल्याला न्याय देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी या पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून 498 अ या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून हुंडा मागण्यासाठी देखील गुन्हा दाखल केला आहे. तसेच तीन तलाक विरोधात देखील गुन्हा नोंद केला आहे.

 

Visit : Policenama.com 

हळद आरोग्यासाठी चांगली, परंतु, योग्य वापर करा, होऊ शकतो दुष्परिणाम
बॉडी बनविण्यासाठी आहारात घ्या ‘हे’ चार शाकाहारी प्रोटीनयुक्त पदार्थ !
 जिममध्ये व्यायाम केल्यानंतर ‘ही’ हेल्थ ड्रिंक्स घेतल्यास होईल फायदा
कामावरुन घरी आल्यानंतर खुप थकवा जाणवतो का ? मग ‘हे’ हेल्दी फुड खा
तुम्ही कधी-कधी विक्षिप्त वागता का ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच
 ‘हा’ आहे जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे …आणि वेळीच करा उपचार