भारताशी ‘पंगा’ घेतल्यानंतर नेपाळमध्ये धोक्यात आली पंतप्रधान केपी ओली यांची खुर्ची, जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनच्या इशाऱ्यावर चालणारे आणि भारत विरोधी असलेले नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचे पद धोक्यात आहे. कम्युनिस्ट पक्षाचे दुसरे अध्यक्ष पुष्प कमल दहल प्रचंड यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी ओली यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली आहे. स्थायी समिती सदस्यांच्या म्हणण्यानुसार, दहल, माधव कुमार नेपाळ, झालानाथ खनल आणि बमदेव गौतम यांनी मंगळवारी सांगितले की, ओली सरकार चालवण्यात अपयशी ठरले आहेत, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा. ओली यांना पंतप्रधानांव्यतिरिक्त पक्षाचे अध्यक्षपद देखील सोडण्यास सांगितले आहे.

विशेष म्हणजे ओली यांचे सरकार वादात अडकले आहे. ओली हे भ्रष्टाचार आणि आता कोविड-१९ च्या अपयशाबाबत जनता आणि विरोधी पक्ष तसेच इतर पक्षाच्या नेत्यांचे लक्ष्य आहेत. ओली यांनी भारतीय क्षेत्र व्यापलेला देशाचा एक नवीन नकाशा प्रसिद्ध केला. त्यांनी राष्ट्रवादाच्या मदतीने त्यांच्याविरूद्ध उठवलेले आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. पण असे मानले जात आहे की ते आपली खुर्ची वाचवू शकणार नाही.

‘भारत नाही, आम्ही राजीनामा मागत आहोत’
खुर्चीला धोका असल्याचा आरोप करत केपी ओली यांनी दोन दिवसांपूर्वी आरोप केला होता की, नवी दिल्ली आणि काठमांडूमध्ये देशाचा नवीन नकाशा प्रसिद्ध केल्यामुळे त्यांच्याविरूद्ध कट रचला जात आहे. त्यांना पदावरून हटवण्याचा कट रचला जात आहे. स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत प्रचंड यांनी ओली यांना सांगितले की, भारत नाही तर ते स्वतः पक्षाचे अध्यक्ष आणि पंतप्रधानपदाचा राजीनामा मागत आहेत. स्थायी समिती सदस्याच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान ओलींकडे पदावरून हटवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा पुरावाही मागितला.

ओली यांनी भारतावर नाराजी व्यक्त केली होती
के.पी. शर्मा ओली यांनी अपयशामुळे सत्ता हातून जात असल्यामुळे भारतावर नाराजी व्यक्त केली होती. नवी दिल्ली आणि काठमांडूमध्ये आपली खुर्ची काढून घेण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे ओली यांनी म्हटले आहे. त्यांनी यासाठी नकाशा वादाचे कारण सांगितले आहे. मात्र सत्य हे आहे की, चीनशी जवळीक असलेले ओली यांच्यासाठी चीनकडून आलेला व्हायरसच पद हिसकावणारे एक मोठे कारण बनला आहे.

काय म्हणाले होते ओली ?
नेपाळ कम्युनिस्ट पक्षामध्ये अल्पसंख्यांक असलेले केपी यांनी रविवारी एका कार्यक्रमात म्हटले, “देशाचा नवीन नकाशा जाहीर केल्याने आणि संसदेत तो मंजूर केल्याने माझ्याविरूद्ध कट रचला जात आहे. बौद्धिक लोकांची चर्चा, नवी दिल्लीतील मीडिया रिपोर्ट्स, दूतावासातील घडामोडी आणि काठमांडूतील वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये झालेल्या बैठकींवरून लोक मला हटवण्यात किती सक्रिय आहेत हे समजणे कठीण नाही. पण त्यांना यश मिळणार नाही.”