सुशांत सिंह राजपूत केस : बिहारहून मुंबईत पोहचलेले तपास अधिकारी पटणा SP विनय तिवारी यांना BMC नं केलं ‘जबरदस्ती’नं क्वारंटाईन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांत सिंह राजपूत केसचा तपास करण्यासाठी आलेल्या बिहार पोलीस दलाच्या अधिकार्‍यांना पुरावे गोळा करण्यात मोठ्या अडचणी निर्माण केल्या जात आहेत. याचे कारण, मुंबई पोलीस सहकार्य करत नसल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान बातमी आहे की, बॉलीवुडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी मुंबईत आलेले पाटणा सीटी एसपी विनय तिवारी यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

पाटणा सीटी एसपी विनय तिवारी यांना मुंबईत आयपीएस मेसमध्ये जागा दिली गेली नाही, ज्यानंतर त्यांनी वैयक्तिक पद्धतीने राहण्याची व्यवस्था केली. यानंतर बीएमसीच्या अधिकार्‍यांनी विनय तिवारी यांना त्यांच्या राहण्याची जागा विचारली आणि त्यांना क्वारंटाइन केले. एसपी विनय तिवारी यांना जाणीवपूर्वक असे केले जात असल्याचे म्हटले जात आहे.

बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी रविवारी रात्री उशीरा ट्विट करत ही माहिती दिली. त्यांनी ट्विट केले की, आयपीएस अधिकारी विनय तिवारी बिहार पोलीस टीमचे नेतृत्व करण्यासाठी अधिकृत ड्यूटीवर आज पाटणाहून मुंबईत पोहचले, परंतु बीएमसीच्या अधिकार्‍यांनी जबरदस्तीने त्यांना क्वारंटाइन केले. विनंती करूनही त्यांची आयपीएस मेसमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. ज्यानंतर ते गोरेगावच्या एका गेस्ट हाऊसमध्ये थांबले होते.

यापूर्वी रविवारी एसपी सीटी विनय तिवारी यांनी मुंबई एयरपोर्टवर म्हटले होते की, सुशांत केसचा तपास योग्य मार्गाने पुढे जात आहे. ज्या लोकांचे जबाब घेतले गेले आहेत, त्याचे विश्लेषण केले जात आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेल्या बिहार पोलिसांच्या टीमला अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई पोलीस बिहार पोलिसांना सहकार्य करत नाहीत, असा आरोप बिहार पोलीस करत आहेत. याच कारणामुळे पाटणा सीटी एसपी विनय तिवारी यांना मुंबईत पाठवण्यात आले होते.

यासंदर्भातील एका वृत्तात लाइव्ह हिंदूस्तानने म्हटले आहे की, बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासात महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. आतापर्यंत घेण्यात आलेल्या जबाबावरून एसआयटीला समजले आहे की, 9 ते 13 जूनच्या दरमयान सुशांत सिंहच्या मोबाईलमध्ये 14 सीमकार्ड बदण्यात आले होते. सुशांतच्या घरात झालेल्या पार्टीनंतर 14 जूनला सुशांतचा मृत्यू झाला. एसआयटी असे पुरावे शोधत आहे, ज्यावर मुंबई पोलीस सुरूवातीपासून पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार एसआयटीला हेदेखील समजले आहे की, आपली माजी सेक्रेटरी दिशाच्या मृत्यूचे सत्य सुशांतला समजले होते. मृत्यूपूर्वी दिशाने सुशांतला फोन करून काही सांगितले होते. सुशांतने हे कुठे बोलू नये, कदाचित या भितीमुळे काही लोकांकडून हस्ते परहस्ते सुशांतला घाबरवले जात होते. सुशांतचा रूम पार्टनर सिद्धार्थ पिठानीला या महत्वाच्या रहस्यांबाबत बरेच काही माहित होते. यासाठीच एसआयटी सिद्धार्थ पिठानीचा जबाब घेण्यासाठी अटोकाठ प्रयत्न करत आहे.

फुटेज गायब केल्याचा आरोप
असे म्हटले जात आहे की, रचलेल्या कारस्थानांतर्गत घटनेनंतर बांद्रा सोसायटीसह सुशांतच्या फ्लॅटमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज मुंबई पुलिस व काही लोकांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. याच करणामुळे पाटणा एसआयटीला अजूनपर्यंत फुटेजसह अन्य इलेक्ट्रॉनिक्स पुरावे मिळू शकले नसावेत. याबाबत बिहार डीजीपींनी स्वत: दुजोरा दिला आहे.