जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये दहशतवादी हल्ला ; CRPF च्या कँपवर ग्रेनेड फेकले ; फायरिंग चालू

जम्मू काश्मीर : वृत्तसंस्था- जम्मू काश्मीरच्या त्राल भागात आज शुक्रवारी दुपारी दहशतवादी हल्ला झाला आहे. या ठिकाणी सीआरपीएफच्या कँपवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. ज्या जागी हा हल्ला झाला त्या जागी १८० बटालियनचा कँप आहे. सांगितले जात आहे की, कॅंपच्या आजूबाजूला अजूनही दहशतवादी हजर आहेत. या कारणांमुळे सुरक्षा दलांकडून सातत्याने फायरिंग चालू आहे. दोन्ही बाजूंनी फायरिंग चालू आहे.

याच वर्षी १४ फेब्रुवारीला दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळेस देखील CRPF च्या कँपवर हल्ला झाला होता. १४ फेब्रुवारीला पुलवामा हल्ला झाला होता. त्या हल्यात सीआरपीएफचे ४० जवान मारले गेले होते.

या हल्ल्यानंतर काश्मीर घाटातील वातावरण बिघडले आणि भारत पाकिस्तान देशामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. गेल्या काही दिवसापासून जम्मू काश्मीर मध्ये सातत्याने दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांकडून हल्ले केले जात आहेत. सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांचा शोध घेऊन घेऊन मारले जात आहेत.आजच शुक्रवारी जम्मू काश्मीरच्या किश्तवाड येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांचे जवान यांच्यामध्ये फायरिंग झाली होती. या हल्ल्यामध्ये तीन दहशतवाद्यांना मारले गेले तर दोन पोलीस जखमी झाले.