देशात ‘नमो’ – ‘रागा’ यांचं ट्विटर अकाऊंट पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर, 8 शब्दांचं ट्विट बनलं ‘गोल्डन’ ट्विट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2019 मध्ये केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांचीच चर्चा होती. ट्विटरवर देखील या दोघांबाबतच्या ट्विटचा पाऊस पहायला मिळाला. या दोघानांही लोकांनी ट्विटरवर लाखो वेळा टॅग केले आणि आपले प्रश्न विचारले. ट्विटर इंडियाच्या एअर व ट्विटर 2019 मधील या दोघांच्याही अकाउंटला पहिल्या आणि दुसऱ्या क्रमवारीत ठेवण्यात आले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तिसर्‍या क्रमांकावर आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. या वर्षीच्या अहवालात ट्विटरने पुरुष आणि महिला नेत्यांसाठी हँडलची स्वतंत्र यादी जाहीर केली आहे. महिला राजकारण्यांमध्ये स्मृती इराणी अव्वल तर प्रियांका गांधी वड्रा दुसर्‍या क्रमांकावर आहेत. करमणूक जगातील सुपरहिरो अमिताभ बच्चन यांनी पुरुष कलाकारांमध्ये अव्वल स्थान पटकावले तर महिला अभिनेत्रींमध्ये सोनाक्षी सिन्हाने हे स्थान मिळवले.

लोकसभा चुनाव – 2019 हा हॅशटॅग सर्वाधिक वापरला गेला तर अयोध्या बाबतच्या निकालही संबंधित हॅशटॅगचा देखील वापर मोठ्या प्रमाणावर झाल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार चंद्रयान – 2 बाबत देखील अनेक ट्विट करण्यात आले. आर्टिकल – 370 हा देखील हॅशटॅग सर्वाधिक ट्रेंडिंगवर होता. तर वर्षातील सर्वाधिक ट्विट केले गेलेला हा पाचव्या क्रमांकाचा हॅशटॅग बनला.

पंतप्रधानांच्या या ट्विटची सर्वाधिक चर्चा
लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर पंतप्रधांनी केलेले आठ शब्दांचे ट्विट लोकांच्या खूप पसंतीस पडले. त्यामुळे या ट्विटला 2019 चे गोल्डन ट्विट म्हणून घोषित करण्यात आले. त्यांनी लिहिले होते की, सबका साथ + साथ विकास + सबका विश्वास = विजयी भारत. 23 मे रोजी करण्यात आलेल्या ट्विटला 1.17 लाखापेक्षा अधिक वेळा रिट्विट केले गेले आहे. 4.19 लाखांपेक्षा अधिक लोकांना हे ट्विट आवडले होते.

या ट्विटर अकाउंटला लोकांनी केले सर्वाधिक टॅग

1. नरेंद्र मोदी @NarendraModi
2. राहुल गांधी @RahulGandhi
3. अमित शाह @AmitShah
4. अरविंद केजरीवाल @ArvindKejriwal
5. योगी आदित्यनाथ @myogiadityanath
6. पीयूष गोयल @PiyushGoyal
7. राजनाथ सिंह @rajnathsingh
8. अखिलेश यादव @yadavakhilesh
9. गौतम गंभीर @GautamGambhir
10. नितिन गडकरी @nitin_gadkari

Visit : Policenama.com