PoK वरून तणाव ! पाकिस्तानचं ‘मिराज’, F-16 घिरटया घालतंय ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारताने मागील आठवड्यात पाकिस्तानला गिलगिट-बाल्टिस्तान तात्काळ खाली करण्याचा इशारा दिला होता. पाकिस्तानला तिथे अनिकृतरित्या ताबा घेतल्याचे सुनावले होते. त्यानंतर लगेच दोन दिवसांनी भारतीय हवामान विभागाने जम्मू-काश्मीरच्या सब डिव्हिजनला आता जम्मू आणि काश्मिर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुजफ्फराबाद म्हणण्यास सुरुवात केली आहे. यावरून पाकिस्तान हादरला असून एलओसीवर तणाव वाढू लागला आहे.

पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर अचानक लढाऊ विमानांची संख्या वाढविण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी सीमेवर एफ 16, जेएफ 17 आणि मिराज III ही लाढाऊ विमानांनी अचानक उड्डाण घेण्यास सुरुवात केली आहे. याबाबतचे वृत्त एका हिंदी वृत्तवाहिनेने दिले आहे. पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुजफ्फराबादवर अवैध ताबा मिळवला आहे.

मंगळवारी आयएमडीने या भगाचा समावेश अनुमानामध्ये केला आहे. या अनुमानामध्ये गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुजफ्फराबादचा उल्लेख करणे भारताचे मोठे पाऊल मानले जातेय. भारताने या भागावर पाकिस्तानला कोणताही हक्क नसल्याचे म्हटले होते. पाकिस्तानी न्यायालयाने या ठिकाणी निवडणूक घेण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानी उच्चायुक्तांना बोलावून सुनावले होते. यानंतर पाकिस्तानने सीमेवर गोळीबार सुरु केला होता.

दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात हंदवाडामध्ये दहशवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासह पाच जवान शहीद झाले होते. त्यामुळे पाकिस्तान घाबरला असून पाकिस्तानला भारताकडून हवाई हल्ला किंवा सर्जिकल स्ट्राईकसारखी कारवाई होण्याची भीती आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या लढाऊ विमानांची हालचाल वाढवण्यात येत आहे. भारतीय सीमारेषेजवळून पाकिस्तानची एफ 16, जेएफ 17 आणि मिराज III ही लढाऊ विमाने झेपावू लागली आहेत.