हडपसर मधून गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेराला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

हडपसरमधील एका सराईत गुन्हेगाराला अटक करुन त्याच्याकडून एक गावडी बनावटीचे पिस्टल आणि चार जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली. ही कारवाई दरोडा प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि.२५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सय्यदनगरमधील कब्रस्तानजवळ केली.

मतीन हकीम सय्यद (वय-३१ रा. गल्ली नंबर १४, कब्रस्तानजवळ, सय्यदनगर) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
[amazon_link asins=’B01M66OLV2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9c1474bc-7a18-11e8-88fd-239f2cd4d1c7′]

दरोडा प्रतिबंधक पथकातील पोलीस नाईक परवेज जमादार यांना मतीन सय्यद या सराईत गुन्हेगाराकडे पिस्टल असून तो कब्रस्तानजवळ येणार असल्यची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अधारे पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून मतीन सय्यद याला अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ तीस हजार आठशे रुपयांचे एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि चार जीवंत काडतुसे सापडली.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ समीर शेख यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे दरोडा प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, यशवंत आंब्रे, विनायक पवार, राहुल घाडगे, दत्तात्रय काटम, शंकर पाटील, परवेज जमादार, प्रमोद गायकवाड, महेश कदम, चेतन गोरे व धनाजी पाटील यांनी केली.