वॉशरूममध्ये 18 वर्षाच्या विद्यार्थीनीला ‘तो’ भेटला, दुसर्‍यानं व्हायरल केला व्हिडिओ अन् तिनं उचललं ‘पाऊल’

वाशिम : पोलीसनामा ऑनलाइन – वाशिममध्ये सोशल मीडियावर क्लिप व्हायरल झाल्याने एका अल्पवयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून या आत्महत्येस तिचे मित्र कारणीभूत असल्याचे समजल्याने तिच्या अल्पवयीन मित्राला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेली माहिती अशी की, वाशिम मधल्या मंगरुळपिर येथील जिल्हा परिषद हायस्कुल येथील ही घटना असून हायस्कुलमधील एका १८ वर्षीय विद्यार्थिनीला नोट्सच्या मागणी करिता विद्यार्थी प्रतीक दिनकर डोंगरे याने वॉशरूम मध्ये बोलावले होते. नेमक्या त्याच वेळेत दिपक महादेवराव वानखडे या मुलाने दोघांच्या चर्चेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्याने तो व्हिडीओ इतर लोकांच्या मोबाईलवर पाठवला. त्यामुळे हा व्हिडीओ झपाट्याने पसरत होता आणि त्याचा वेगळा अर्थ देखील काढण्यात येत होता. हाच व्हिडिओ त्याने शाळेतील शिक्षक अरुण चव्हाण यांच्या मोबाईलवरही पाठवला. त्यानंतर त्या शिक्षकांनी देखील हा व्हिडीओ इतरत्र पसरवला. ही क्लिप झपाट्याने सगळीकडे पसरत असल्याने विद्यार्थिनीला समाजात बदनामी होईल असे वाटू लागले. आणि या व्हायरल झालेल्या क्लिपमुळे विद्यार्थिनीने खरबी (पिंप्री) येथील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली.

दरम्यान, या घटनेची फिर्याद मृतक विद्यार्थिनीच्या पालकांनी मंगरुळपिर पोलीस ठाण्यात नोंदविली असून पोलिसांनी या घटनेचा तपास चालू केला आणि पोलिसांनी ४ जणांना अटक केली. आरोपींच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून सोशल मीडियाचा सर्वांनी काळजीपूर्वक वापर करावा अशा चर्चा होताना दिसत आहेत.

या प्रकरणात सोशल मीडियाच्या गैर वापरामुळे एका शालेय विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागला तर तिच्या वर्ग मित्राला जेलची हवा खावी लागली आहे. शाळेत घडलेल्या या घटनेत ते केवळ वॉशरूम मध्ये एकमेकांशी बोलत होते. जर त्या मुलाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला नसता किंवा व्हिडिओ क्लिप जर सोशल मिडियाद्वारे व्हायरल केली नसती. तर त्या विद्यार्थिनीचे प्राण वाचले असते. त्यामुळे सोशल मीडियाचा सर्वांनी काळजीपूर्वक वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. जेणेकरून अशा घटनांना आळा बसू शकतो.

Visit : Policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like