बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेलेली विद्यार्थीनी आली नाही बाहेर, कुटुंबियांनी तोडला दरवाजा तर…

महेंद्रगड : पोलीसनामा ऑनलाइन – येथील पथरवा गावात एक १७ वर्षांची बारावीत शिकणारी मुलगी बाथरूम मध्ये आंघोळ करत असताना तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून पोस्टमार्टम केल्यानंतर कुटुंबियांच्या ताब्यात दिला. पथराव ढाणी गावातील मृत मुलीचे आजोबा बंसीधर यांनी सांगितले की, २१ डिसेंबरला दुपारी दोनच्या सुमारास त्यांची नात निशू बाथरूमध्ये आंघोळीसाठी गेली. बराच वेळ होऊनही ती बाहेर न आल्याने घरच्यांनी दरवाजा तोडला तर निशू बेशुद्ध पडलेली होती.

निशूला महेंद्रगडच्या सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. महेंद्रगडचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नवीन अग्रवाल यांनी सांगितले की, थंडीत बाथरूमध्ये आंघोळ करताना ऑक्सिजन न मिळाल्याने श्वास कोंडल्याने तिचा मृत्यू झाला आहे.

या घटनेवरून लोकांनी सावध होण्याची गरज आहे. कारण अनेक लोकांच्या घरात गॅस गिझर लावलेले असतात. हे गिझर बाहेर लावण्याची गरज आहे. कारण गॅस गिझरमध्ये पाणी गरम होण्यासाठी ज्योत पेटते. कोणतीही ज्योत पेटण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. त्यामुळे बाथरूमधील ऑक्सिजन संपतो बाथरूम बंद असेल तर केवळ कार्बन मोनॉक्साइड गॅसच शिल्लक राहतो. ज्यामुळे आतील व्यक्तीचा श्वास कोंडू शकतो.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/