‘सिमी’वर पुन्हा पाच वर्षांची बंदी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध अधिनियमान्वये स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. भारत सरकारने यासंबंधी ३१ जानेवारी २०१९ रोजी अधिसूचना काढून बंदी घालण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेचे नायब तहसीलदार नागेश गायकवाड यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

देशात विविध ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेत तसेच जातीय दंगली घडवून आणण्यात सिमी संघटनेचा हात असल्याचे निष्पन्न झाल्याने सिमीवर यापूर्वी बंदी घालण्यात आली होती. गेल्या १० वर्षांपासून ही बंदी घालण्यात आली आहे.

पुण्यातील जंगली महाराज रोड, फरासखाना पोलीस ठाण्याचे आवार या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात सिमीचा हात होता. तसेच देशभरात विविध ठिकाणी झालेल्या जातीय दंगली तसेच बॉम्बस्फोट सिमीने घडवून आणल्याचे तपासात उघड झाले होते. त्यामुळे सिमीवर यापूर्वीही बंदी घालण्यात आली होती. या बंदीची मुदत संपत असल्याने त्यांच्यावर पुन्हा बंदी घालण्यात येत असल्याचा आदेश काढण्यात आला आहे.