Lockdown : विद्यार्थ्यांना फोन, SMS, ‘ऑनलाईन’द्वारे निकाल मिळणार

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसमुळे राज्यात संचारबंदी लागू असून राज्यातील शांळामधील निकाल आता फोन, एसएमएस आणि ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहेत. पहिली ते आठवी आणि नववी व अकरावीच्या निकालासंदर्भात शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी दूरध्वनी, एसएमएस व अन्य ऑनलाइन पद्धतीने लवकरात लवकर निकाल लावावा जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये कोणताही संभ्रम राहणार नाही. विद्यार्थ्यांना उपलब्ध साहित्याच्या आधारे पुढील शैक्षणिक वर्षाचा अभ्यास करता येणे शक्य होईल अशा सूचना राज्या शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिल्या आहेत.

यामुळे शिक्षकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वर्षभरातील घटक चाचणी, सहामाही निकालाची कागदपत्रे, विद्यार्थ्यांची माहिती सर्व शाळांमध्ये असताना घरी बसून शिक्षकांनी निकालाची कार्यवाही कशी करायची ? शिवाय संचारबंदीच्या काळात शाळांत पोहचायचे तरी कसे असे अनेक प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहेत. पुढील शैक्षणिक वर्ष सुरु होण्याआधी शाळांनी, कनिष्ठ महाविद्यालयांनी निकाल पत्राबाबतची कार्यवाही पूर्ण करावी असे पत्रात म्हटले आहे.

मात्र, शिक्षण विभागाकडून अद्याप नवीन शैक्षणिक वर्षाबाबतची काही माहिती देण्यात आली नाही. आत्ताच जे शिक्षक त्यांच्या मूळ गावी नाहीत त्यांना गावी जाण्याची परवानगी मिळाली आहे. मग त्यांनी त्यांचे व्हेकेशन पिरेडमध्ये काम कसे करावे ? रेड झोनमध्ये असलेल्या शिक्षकानंतर शाळांमध्ये पोहचणे ही कठीण आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांनी निकालपत्र तरी कसे तयार करायचे असा प्रश्न शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पांड्या यांनी उपस्थित केला आहे.

दहावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता

अनेक शिक्षकांनी 10 वी बोर्डाचे पेपर देखील शाळेतच आहेत ते तपासून नियमकांकड केस पाठवायचे याबाबत निर्णय अजूनही राज्य मंडळाने घेतला नाही. त्यामुळे 10 वीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शाळा व शिक्षकांपुढील अडचणी पाहता निकाल पत्र पालकांना देण्याची घाई करू नये अशी प्रतिक्रिया भाजप शिक्षक आघाडीचे मुंबई विभागाचे संयोजक अनिल बोरनारे यांनी दिली.