IAS Success Story : नेहमी टॉप करणार्‍या सौम्याने UPSC मध्येसुद्धा कायम राखले सातत्य आणि पहिल्याच वेळी बनली टॉपर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सौम्या पांडे सध्या आयएएस पदावर कार्यरत आहे. सौम्या अलाहाबादची आहे आणि तिचे शालेय शिक्षण येथेच झाले आहे. लहानपणासून ती अकॅडमिक्समध्ये खूप चांगली होती, जे शेवटपर्यंत कायम राहिले. 2016 मध्ये मात्र 23 वर्षांच्या वयात आणि आपल्या पहिल्याच प्रयत्नात सौम्याने यूपीएससी सीएसई परीक्षेत टॉप केले होते. चौथ्या रँकसह ती टॉपर बनली आणि आपले आयएएस बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. दिल्ली नॉलेज ट्रॅकला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये सौम्याने आपला अनुभव शेअर केला.

सौम्याच्या यशाचा प्रवास

सौम्याने दहावी आणि बारावी दोन्ही वर्गात जिल्ह्यात टॉप केले होते. 10 वीत तिला 98 टक्के, तर 12 वीत 97.8 टक्के होते. ग्रॅज्युएशनमध्ये इंजिनियरिंग निवडले आणि इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगने ग्रॅज्युएशन पूर्ण केले. येथेसुद्धा तिला गोल्ड मेडल मिळाले. यानंतर ताबडतोब सौम्याने एक वर्षाचा गॅप घेतला आणि यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. नंतर तिने पहिला प्रयत्न केला आणि पहिल्याच प्रयत्नात टॉपर बनली.

प्रीसाठी एनसीईआरटी आणि टेस्ट सीरिज आवश्यक

सौम्याने म्हटले, प्री परीक्षेची तयारी करण्यासाठी बेसिकपासून सुरुवात करावी. यासाठी एनसीईआरटीशिवाय कोणताही चांगला पर्याय नाही. यातून वाचा आणि त्यानंतर स्टँडर्ड बुक्सवर जा. जेव्हा तयारी एखाद्या लेव्हलवर पोहाेचेल तेव्हा टेस्ट द्या. टेस्ट सीरिजला सौम्या प्रीला खूप आवश्यक मानते. ती म्हणते की, यामुळे तयारी पक्की होते, तुम्हाला तुमच्या कमतरता समजतात आणि त्या वेळीच दूर करता येतात.

मेन्स असते मुख्य टेस्ट

सी-सॅटला सौम्या जास्त कठीण मानत नाही. ती म्हणते, जर तुम्ही तुमचा मागील अभ्यास चांगला केला असेल, तर क्वालिफाईंग नेचरचा हा पेपर पास करण्यात अडचण येणार नाही. तसेच प्रीपेक्षा जास्त मेन्स महत्त्वाची असल्याचे सौम्या म्हणते. ज्यातील कामगिरी तुम्हाला पुढील दरवाजे खुले करते आणि रँक मिळवण्यातसुद्धा महत्त्वाची भूमिका निभावते. सौम्या इतर पुस्तकांशिवाय न्यूज पेपरला या परीक्षेसाठी खूप जरुरी मानते.