‘उध्दवजी पुन्हा परत या’, मुनगंटीवारांचं मुख्यमंत्र्यांना ‘आवाहन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेनेनं एकत्र लढवली होती. मात्र मुख्यमंत्री पदावरून मतभेद झाल्यामुळे शिवसेनेनं आपली २५ वर्षाची युती तोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी हातमिळवणी करून मुखमंत्रीपद मिळवले आणि पर्यायाने महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. निवडणूक एकत्र लढवली असताना भाजपशी फारकत घेतल्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खूप टीका झाली. दरम्यान भाजप नेत्यांना विश्वास आहे की शिवसेना पुन्हा त्यांच्या बरोबर येईल.

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साद घातली आहे की, “राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या चकव्यात येऊ नका, हि मंडळी तुम्हाला मनापासून काम करून देणार नाही. तुमचे विचार आणि भाजपचे विचार एकत्र असल्याने उद्धवजी तुम्ही परत फिरा…”

विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून सभागृहात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका पुढे ढकलण्यासंदर्भात बिल मांडण्यात आले. याला भाजपने विरोध केला, यावेळी सुधीर मुनगंटीवार बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते संचालक मंडळावर कायम राहण्यासाठी हे बिल आणू पाहत आहे, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.