मुनगंटीवार यांच्या गाडीला ट्रकची धडक, मुनगंटीवार सुखरूप

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या फाॅर्च्यूनर गाडीला बांबुने भरलेल्या ट्रकने धडक दिली. सुदैवाने या अपघातातून मुनगंटीवार थोडक्यात बचावले. बल्लारशहा पोलिसांनी मद्यधुंद ट्रकचालकाला अटक केली आहे.

याप्रकरणी फाॅर्च्यूनरचालक मनिश अलमस्त (रा. चंद्रपूर) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, मुनगंटीवार यांचा शुक्रवारी चंद्रपूर – बल्लारपूरचा दौरा होता. त्यांनी बल्लारपूर येथील नाट्यगृहाचे उद्घाटन दुपारी ३ वाजता केले. त्यानंतर ते विश्रामगृहात गेले. तेथून सायंकाळी ७ वाजता पुढील कार्यक्रमाकरीता निघाले. त्यांच्या गाडीसमोर पायलट गाडी होती. बल्लारशहा येथील नगर परिषद चौकात यु टर्न घेत असताना त्यांचा सर्व कॅन्वाय डाव्या बाजूला थांबला असताना अचानक एक ट्रक उजव्या बाजुने बामणी फाट्याकडून वेगात आला व त्याने मुनगंटीवार यांच्या फाॅर्च्यूनर गाडीला मागच्या बाजूला धडक मारली.

सुदैवाने ही धडक जोरात नसल्याने मुनगंटीवार यांना काहीही लागले नाही. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले असताना तो दारु पिऊन गाडी चालवत असल्याचे आढळून आले. या अपघातानंतर सुधीर मुनगंटीवार हे पुढील कार्यक्रमाला निघून गेले.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या

You might also like